पावन भूमी सांगते महती | महान अपुली भारतीय संस्कृती || प्रथम पुजावा गणपती, आराध्य दैवत माता भवानी, बानु म्हाळसा पती | महाराष्ट्राचे दैवत राजा शिवछत्रपती || इंदोर नरेश मल्हारबांची महान कीर्ती | पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य देई मनाला स्फुर्ती || रणझुंजार महाराजा यशवंतरावांची काय वर्णावी महती | इतिहासाची पाने साक्ष देती || हृदयी भिनली फुले शाहूंची समता नीती | भारतरत्न भीमरायांच्या विचारांची तोफ मनी गर्जती || देशसेवा, समाजसेवा स्वछतेचा वसा घ्या हाती | गाडगेबाबा - तुकडोजींची विचारधारा मनी गुंजती ||
जुळून आली नातीगोती | अनमोल अपुली उपस्थिती || व्हावी अक्षदारुपी आशीर्वादाची बरसात वधूवरांच्या माथी | हिच .............आणि .............परिवाराची आग्रहाची विनंती ||
जुळून आली नातीगोती | अनमोल अपुली उपस्थिती || व्हावी अक्षदारुपी आशीर्वादाची बरसात वधूवरांच्या माथी | हिच .............आणि .............परिवाराची आग्रहाची विनंती ||
© लेखक : राहुल दादा बिचकुले