माझा समाज आणि शिक्षण
मनामध्ये येई विचार
माझा समाज धनगर
शिक्षणाची जरी इच्छा फार
परी जिवनाचा प्रवास खडतर
आम्ही राखतो मेंढर
होऊनी जीवावर उदार
आम्ही समजतो कर्तव्य थोर
लक्ष्मी आहे आमची मेंढर
माझा समाज धनगर
शिक्षणाची जरी इच्छा फार
परी जिवनाचा प्रवास खडतर .......
माझ्या मनामध्ये विचार येतो कि, मी धनगर समाजाचा आहे आणि माझा समाज शिक्षणाच्या बाबतीत खुप मागे आहे. माझ्या समाजाला शिकण्याची इच्छा खुप आहे. पण जिवन जगण्याचा प्रवास अवघड आहे. रोज पायाला भिंगरी बांधल्यागत या गावातुन त्या गावात आणि त्या गावातुन पुढच्या गावात अशी रानोमाळची भटकंती सतत चालु आहे. त्यामुळे शिक्षणाची खुप हेळसांड होत असते. कधी आपल्या बकऱ्याकडे पासारी ( आधार ) म्हणुन आपल्या शिकत असलेल्या पोरांना शिकवायची इच्छा असूनही आईबापाला नाईलाजाने शाळेतुन काढून बकऱ्याकडे ठेवावे लागते. कारण आम्ही आमच्या मेंढरांना आमची लक्ष्मी समजत असतो. व त्या मेंढरांच्या जिवावरच हे एका इताच पॉट भरीत असतो. आणि बकरी सांभाळणे हेच आमचे कर्तव्य आहे. कारण आम्हाला जगवणारी आमची बकरी आणि त्या बकऱ्यांचा सांभाळ करणारा हा धनगर समाज.... शिकण्याची जरी खुप इच्छा असली तरी आमच्या जगण्याचा प्रवास अवघड आहे....
लावुन भाळाला भंडार
मुखी खंडोबाचा जयजयकार
करुनी अहिलेचे स्मरण
जगतो आमुचे जिवन
देतो जरीपटक्याला मान
भगव्याचा उरामधी अभिमान
पिवळ्या ध्वजाची राखतो शान
राजा शिवछत्रपती राजा महान
महाराजा यशवंतराव होळकर प्रेरणास्थान .......
समाजभुषण आदर्श महाराणी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर
आमच्या समाजात भंडार ( हळद ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत जेजुरीचा खंडोबा हे आमचं रानोमाळी हिंडत असताना मनातली भीती दुर करणार शक्तिशाली देवस्थान या देवाची साया ( सावली ) म्हणुन सतत भाळावर ( कपाळी ) लावला जातो. तसेच आमच्या समाजातील थोर महाराणी पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर यांची शिकवण सतत मनात राहावी यासाठी त्यांची आठवण काढुन आम्ही आमचे जिवन जगत असतो...
आमच्या समाजातील राजे महाराजे यांच्याही मनात जरीपटक्याला मानाचे स्थान होते त्याचप्रमाणे आमच्याही मनात जरीपटका आणि हिंदु धर्माचा भगवा ध्वज याला मान आहे. आम्हाला भगव्या ध्वजाचा अभिमान आहे. कारण याच भगव्या ध्वजाच्या सावलीत राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करत स्वराज्याची निर्मिती केली. त्या महान राजाचा सर्वांनाच अभिमान आहे.
समाजाला एक करण्यासाठी पिवळ्या ध्वजाचे मोलाचे कार्य आहे. त्याच पिवळ्या ध्वजाची शान राखण्यासाठी हा धनगर समाज त्या पिवळ्या ध्वजाच्या सावलीत एकत्र येत असतो. महाराजा यशवंतराव होळकर हे आमचे प्रेरणास्थान आहे.
या सर्व देवी देवतांच्या वरदहस्ताखाली आणि महापुरुषांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन आम्ही हे आमचे भटके जीवन आजही आनंदाने जगत आहे...
खंडोबाची राणी
आमची धनगराची बानू
नवसाची कन्या
आम्ही देवदासी मानू
देवदासी घाली जागरण
हेची तिचे शिक्षण
अशी तिला शिकवण
देवाचे महात्म्य सांगी
समाजाला हसवुन
संगे वाघ्याची हो साथ
घाटी दिमडीचा नाद
गीत देवाचे गाऊन
करी कथा देवाची कथन
देवदासी हो नाचुन
हिंदु धर्मात खंडोबा हे आराध्य दैवत मानले जाते व देवाची कृपा राहावी यासाठी घरोघरी जागरण घालतात. या जागरणात वाघ्या मुरुळी देवाची कथा नृत्य व गायन करून लोकांच्या समोर मांडले जाते. देवदासी व वाघ्या यांना या नृत्यांचे व गायनाचे शिक्षण दिले जाते. व नंतर त्या विद्येत ते पारंगत होऊन देवाचे महात्म्य समाजाला सांगत असतात. तसेच समाजाची करमणूक त्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे देवावरील भावना समाजात खोलवर रुजली जाते.
वाघ्या हा देवाचा अवतार समजला जातो. आणि मुरुळी ( देवदासीला ) देवीसामान मानले जाते. हे खंडोबा देवाचे सेवेकरी असतात. ते घाटी दिमडी हे वाद्य वाजवून गीत गातात. व देवाची कथा समाजापुढे मांडतात.
खंडोबा हा देव आमच्या बानुसाठी धनगर झाला व तिला आपली राणी बनवली . आमच्या समाजात आजही अनेक प्रथा पाळल्या जातात. जर मुल होत नसेल तर खंडोबा देवाला नवस केला जातो... आणि नवसाने पहिली मुलगी जन्माला आली तर ती देवाची म्हणून तिला देवाला जागवण्यासाठी देवदासी ( मुरुळी ) समजली जाते....

Nice
उत्तर द्याहटवा