शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

छत्रपती शिवाजी महाराज दैवत माझे..... मराठी मनाचे राजे....

शिवबा कुणाचा 
मराठी मनाचा 
मराठी मन कुणाचे 
महाराष्ट्रातील मातीचे 
आठरापगड जातीचे !

महाराष्ट्र असो व इतर राज्य, राज्य सोडा देश, देशाबरोबर परदेश म्हणजे सबंध जगात ज्या राजाला आजही आदर आहे... असे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा सादर प्रणाम......

     छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी मनाचा माणुस यांच्यातील अतूट नातं खरच खुप सुंदर आहे. त्याच राजाचे प्रत्येकाच्या हृदयात मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रत्येक मराठी मनाच्या माणसाच्या हृदयावर ठसा कोरलेला आहे. म्हणूनच प्रत्येकजण अभिमानाने सांगतो छत्रपती  शिवाजी राजा हा आमचा राजा आहे. या महाराष्ट्राच्या मातीतील एक आदर्श राजा म्हणुन या राजाची ओळख जगात आहे. तसेच आठरापगड जातींना भगव्या ध्वजाखाली एकत्र आणुन हे स्वराज्य उभे केले. त्या आठरापगड जातीच्या मनातही शिवरायांची प्रतिमा कोरली गेली आहे. कि छत्रपती शिवाजी राजा  हा आमचा राजा आहे आणि आम्ही त्याचे मावळे..... म्हणुन शिवरायांचे जरी नाव ऐकले तरी अंगात नवशक्ती निर्माण होते. असे हे प्रेरणा स्थान सर्वांच्या हृदयात आजही राज्य करीत आहे.  

    या राजाने मोगलांच्या ताब्यातून आपल्या महाराष्ट्राला मुक्त केले, महाराष्ट्रातील या मातीवर असलेले मोगल साम्राज्य हटवले आणि या मातेसमान असणाऱ्या महाराष्ट्रातील मातीच्या शिरावर भगवा फडकवला आणि आठरापगड जातीतील मावळा या भगव्या ध्वजाखाली जमवला. कारण आपल्या राजाला ठाऊक होते कि, हे आपले सवंगडी आहेत. ते आपल्याला एकटे सोडणार नाहीत. कारण महाराष्ट्राच्या मातीत संस्कृतीचे अमृत भरलेले आहे. आणि भगव्याच्या सावलीतील त्याग कमी झालेला नाही.
      महाराष्ट्रातील मातीत जेव्हा कोणी जन्माला येतो तेव्हा त्याला संस्कृतीचे अमृत पाजले जाते. आणि जेव्हा तो मोठा होत असतो. तेव्हा त्याला भगव्या ध्वजाच्या सावलीत खेळत बागडत असताना  त्यागाची शिकवण  दिली.
      आजही आपल्या राज्याबरोबर सबंध देशात त्याचबरोबर संपूर्ण जगात आपल्या या छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांना अभिमान वाटतो....


परस्त्री मातेबहिणीसामान 
आम्हाला शिवबाची शिकवण 
आम्हाला वाटतो अभिमान 
कारण मराठी आमचे मन !

      आजही मराठी माणसाला परस्त्री  मातेबहिणीसमान वाटते. तो शिवबाची शिकवण मानुन परस्त्रीचे रक्षण करण्यासाठी धाव घेतो. कारण मराठी मनाचा माणुस आणि शिवबाचा मावळा असल्याचा त्याला अभिमान वाटतो.
    म्हणुनच मराठी माणसाच्या मनात संस्कृतीच्या अमृताचा अंश आहे.  शिवबाच्या शिकवणीमुळे मराठी मनाच्या माणसाच्या मनात परस्त्री विषयी आदर आहे तो तिला माता लक्ष्मी पार्वतीच्या रुपात म्हणजे आईसमान मानतो. आणि तिच्या संरक्षणासाठी केव्हाही ते मराठी मन तयार असते. 


गर्वाने बोलते मराठी मन
आम्हा शिवबाचा अभिमान
पण भरकटू लागले मन
नष्ट होऊ लागला अभिमान
कलंकित होऊ लागली मन
नाही देत परस्त्रीस मान
अशीच का ? आपल्या शिवबाची शिकवण
अशीच का ? आपल्या शिवबाची शिकवण !


    मराठी मनाची म्हणजे महाराष्ट्रातील मातीची, या आठरापगड जातीची माणस गर्वाने बोलतात. मला शिवाजी राजाचा अभिमान आहे. त्यांची जयंती साजरी करून त्यांच्या विचारांना उजाळा देतात. त्यांची आठवण जिवंत राहावी यासाठी जयंत्या साजऱ्या करतात. पण याच माणसाचे मन आता भरकटू लागले आहे. त्यांना असणारा अभिमान कमी होत चालला आहे. जणु त्यांचे मन कलंकित होऊ लागले आहे.   कारण आजची परिस्थिती पाहता असे वाटू लागले आहे कि,  स्त्री सुरक्षित नाही. याच स्वराज्यात आज स्त्रीला स्वसंरक्षण  करणे अवघड जावू लागले आहे. एक काळ असा होता कि या स्वराज्यात परक्या शत्रूच्या स्त्रीलाही हे स्वराज्य सुरक्षित वाटत होते. परंतु आज आपल्याच या स्वराज्यात आपल्याच माय बहिणींना सुरक्षित आहोत कि नाही हा प्रश्न पडलेला आहे.?      म्हणुन प्रश्न पडतो कि आपलं हृद्य ज्या देवासाठी दिलेले आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आपली मन इतकी कमकुवत आणि कलंकित कशी होऊ लागली आहेत. कारण आपण इथे स्वतःच्या स्त्रीचे संरक्षण करू शकत नाही. कारण आपण शिवबाची शिकवण विसरलेलो आहे. आपण परस्त्री ला मान देत नाही. तिचा आदर करीत नाही. तिचा सन्मान करीत नाही. म्हणुन या स्वराज्यात आपल्या स्त्रीलाही स्वसंरक्षणाची भीती वाटत आहे. 


जो विसरेल शिवबाची शिकवण 
त्याचे नसेल मराठी मन 
तो नसेल महाराष्ट्रातील मातीचा 
तो नसेल आठरापगड जातीचा 
त्याच्या मनामध्ये नसेल अंश संस्कृतीचा 
तो पुत्र नसेल महाराष्ट्रातील मातीचा !

जो कोणी शिवबाची शिकवण विसरला असेल. परस्त्रीस मातेबहिणीसमान मानत नसेल त्याचं मन मराठी नसणार आहे. तो महाराष्ट्रातील मातीचा नसणार आहे. तो नसणार भगव्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या आठरापगड जातीमधील. कारण त्याच्या मनात या संस्कृतीचा अंशच शिल्लक नसेल. तो भगव्या ध्वजाचा त्याग विसरलेला असेल.
    कारण या मातीत जन्मलेला प्रत्येक जण शिवबाचा मावळा म्हणून जन्माला येतो. आणि तो वाईट कृत्य करू शकत नाही. त्याच्या नसानसात शिवबाची शिकवण असणार आहे. आणि तो आपल्या मनाला कलंकित होऊ देणार नाही.  

शिवबा कुणाचा 
मराठी मनाचा 
महाराष्ट्रातील मातीचा 
आठरापगड जातीचा 
गर्वाने सांगु शिवाजी राजा 
देव माझा ! देव माझा ! 

       छत्रपती शिवाजी राजा पुत्र माता जिजाऊचा, राजा महाराष्ट्राचा, आहे देव आमचा.! म्हणजे  छत्रपती  शिवाजी राजा हा स्वराज्यातील सर्वांचा राजा आहे.  त्याचा आभिमान आज साऱ्या जगाला आहे.
      छत्रपती  शिवाजी राजाने स्वराज्य निर्मितीचे कार्ये केले. स्वराज्यातील सर्वांना सुखी करण्याचे कार्ये केले. परस्त्रीचा सन्मान केला. कधीही भेदभाव केला नाही. सर्वांना सोबत घेऊन हे स्वराज्य उभे केले. तो कुणा एकट्यासाठी नाही जगला तर सबंध स्वराज्यातील रयत जनता भगव्या ध्वजाखाली एकत्र आणुन सर्वांना सुखी करण्यासाठी जगला.
    म्हणुन गर्वाने सारेजण म्हणतात. छत्रपती शिवाजी राजा ! आहे देव माझा !
      म्हणुन सर्व स्वराज्यातील मावळ्यांना माझी विनंती आहे कि महाराजांची जयंती फक्त मौज, मजा, मस्ती साठी करू नका. तर त्यातुन समाजप्रबोधन करा. परस्त्रीला मान द्या. तेव्हा आपली स्त्री सुरक्षित राहील. भेदभाव न  करता सारे एकत्र या.... आणि या स्वराज्याला पुन्हा निर्माण करा......
    कारण हे स्वराज्य आज धोक्यात आहे. इथे स्त्री सुरक्षित नाही. भ्रष्टाचार फोफावत आहे. सामान्य जनता भरडली जात आहे. त्यामुळे शिवबाची शिकवण आचरणात आणूया .


चला शिवबाची शिकवण आचरणात आणूया
शिवराज्य पुन्हा निर्माण करूया ...................! 


जय शिवाजी जय भवानी 


©लेखक / कवी राहुल दादा बिचकुले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...