रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

मैत्रीतील गोडवा


मैत्रीतील गोडवा 


मैत्रीचं बंधन
त्याला आपुलकी चं कोंदण
हे नातं वेगळंच असतं
एकमेकांशिवाय अधुरं
जशी पावाशिवाय मिसळला चव नाही...
गुळ साखरे शिवाय चहाला
तसंच मित्रांशिवाय मैत्रीला मजा नाही....
गुळ आणि साखर दोन्हीपासुन चहा बनवता येतो.
पण चव वेगवेगळी....
साखरेचा चहा तर रोजच पितो
पण गुळाचा आपुलकीने .....
मित्र असंख्य आहेत पण तुम्ही मात्र गुळासारखे....
आपुलकी, प्रेम, याने पुरेपुर भरलेले
अशा माझ्या गुळासारख्या गॉड मित्रांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


आपला मित्र..... 

मैत्री बंधन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मैत्री बंधन दिवस



खेळाच्या मैदानावर
आठवण ज्याची येते
शाळेच्या गेटवर
वाट ज्याची पहाते
असे हे जगावेगळे
मैत्रीचे हे नाते

कधी रुसायचं
कधी फुगायचं
कधी हसायचं
कधी बसायचं
नाश्त्याच्या कट्ट्यावर
एकत्र बसुन जेवायचं

वस्तूची देवाण घेवाण
एकमेकांना घ्यायचं समजुन
अडीनडीला पैश्याचही दान
जिथं नाही हिशोबाला स्थान
असा आहे दोस्तीचा बहुमान
हिच दोस्ती हिच मैत्री
हेच तर मैत्रीचे हे नाते
जे मित्र मैत्रिणींविना रिते.....

    आज मैत्रीबंधन दिवस माझ्या सर्व मित्र मैत्रिणींची खुप आठवण येते. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या तरी गोष्टीतुन मित्र असतो. मित्र म्हणजे कोण आपल्या मनातील ओझं ज्याच्यापाशी हलकं करता येईल अशी व्यक्ती. 

   आजवर मला असंख्य मित्र मिळाले. त्यात विशेष तुम्ही आहात. तुमचे स्थान मित्र म्हणुन अढळ आहे. कारण जीवन जगत असताना कळत नकळत तुम्ही मला जीवनाच्या प्रत्येक वळणावर साथ दिली आहे. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐



माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना मैत्रीबंधन दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा💐💐💐💐💐
आपलाच मित्र......!!! 

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...