रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा





 सोनं घ्या सोन्यासारख रहा

निसर्गाचा आदर करा

प्रेमाने निसर्ग देईल ते घ्या

निसर्गाला ओरबाडू नका

आज आहे दसरा

जुने विचार थोडे विसरा

झाडे लावा झाडे जपा

झाड तोडू नका

पुजेला एका पानाची गरज

त्यासाठी झाडाचे जीवन खोडू नका

हि सृष्टी आहे महान

कार्य करूया पुण्यवान

करू सणाला वृक्षांचे दान

राखू निसर्गाची आपण शान

मनाला मिळेल समाधान

मिळेल नवा आत्मसन्मान

सोबती राहुद्या या नव्या

विचारांची देणं

सार्थकी लागेल जीवन

निसर्ग जे देईल ते आनंदाने घ्या

स्वार्थ नको मनात

निसर्गासाठी सुद्धा काहीतरी द्या

आज आनंदाचा सण

सोनं घ्या सोनं द्या

वादविवाद सारे विसरा

विचारांचे बीज पसरा

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला

हॅप्पी दसरा....


दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..


*आपली नाथदेवराई*


गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून नाथदेवराई फाउंडेशन ने साजरा केला वृक्षदान व वृक्षारोपण सोहळा.

  'करून वृक्षरोपण फुलवु वनराई, हिरवीगार दिसेल धरणीमाई, जीव लावुनी कार्य करते आपली नाथदेवराई' हे ब्रीद घेऊन नाथदेवराई फाउंडेशनचे सदस्य वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्य करत आहेत.


माणकोबा वाडा येथे आयोजित केलेला वृक्षदान व वृक्षारोपण सोहळा : नाथदेवराई फाउंडेशन 


 दौंड तालुक्यातील माणकोबावाडा येथे सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे औचित्य साधुन दि. २२ रोजी  नाथदेवराई फाउंडेशन ने वृक्षारोपण व वृक्षदान कार्यक्रम आयोजित केला होता. 'करून वृक्षरोपण फुलवु वनराई, हिरवीगार दिसेल धरणीमाई, जीव लावुनी कार्य करते आपली नाथदेवराई' हे ब्रीद घेऊन नाथदेवराई फाउंडेशनचे सदस्य वृक्षारोपण व झाडांचे संगोपन करण्याचे काम करत आहेत.  

    सकाळी ९ वाजता देवीची आरती करून नाथदेवराई फाउंडेशन, जोगेश्वरी ग्रुप, सिद्धनाथ तरूण मंडळ, माणकोबा तालीम संघ, व माणकोबावाडा ग्रामस्थ एकत्र येऊन झाडांची पुजा करून झाडांचे वाटप करण्यात आले . त्यानंतर माणकोबावाडा रस्त्याला देशी वृक्षांचे वृक्षरोपण करण्यात आले.

    नाथदेवराई फाउंडेशनचे सदस्य पोपट शिवाजी लकडे यांनी आपल्या मुलीच्या जन्माचा आनंद म्हणुन ५० चिंचेच्या वृक्षांचे वाटप केले. व सर्वांना माझी मुलगी माझा अभिमान हा संदेश दिला. 

   या कार्यक्रमासाठी मारुती बाळु बिचकुले, धुळा सटु भिसे, दादा हिरामण बिचकुले, राजु बबन बिचकुले, दादा ठकू भिसे, लहू लक्ष्मण लकडे, भिमाजी बापु लकडे, मल्हारी नाथु बिचकुले, पप्पु बाळू लकडे, भाऊसो भिमाजी खताळ, प्रकाश बापु भिसे, कैलास भिमाजी पिंगळे व बापु बबन लकडे आदी कार्यकर्त्यांनी वृक्षभेट व इतर सहकार्ये केले.

  त्याचबरोबर या कार्यक्रमाला नाथदेवराई फाउंडेशन सदस्य, माणकोबा वाडा ग्रामस्थ व प्रमुख पाहुणे म्हणुन श्रीकांतजी हंडाळ ( दौंड भटकंती) हे उपस्थित होते.

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...