गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

सखे तुझी फार आठवण येते

सखे



सखे... सखे

तुझी आठवण फार येते
तू नसते जेव्हा सोबत
पण डोळ्यासमोर चित्र उभे राहते

आठवतात रोजचे दिवस
आठवते तुझी सोबत
तुझा सहवास जणु 
गुलाबाचे फुल 
मऊ मुलायम स्पर्श
आणि मोहक अदाकारी
सतत आठवते

आणि मन भेटीसाठी व्याकुळ होते
तुझी हवी सदा सोबत
आज, उद्या आणि कायमची 
हिच साथ ग जन्मोजन्मीची

नको दुरावा

नको ग रुसवा
तुझ्याविना दिवस सरकत नाही
तु थोडी दूर जाता
मन व्याकूळ होई

रविवार, २६ जानेवारी, २०२०

जय जवान जय किसान



वंदन भारतभूमीला
वंदन भारतमातेला
भारतमाता, राष्ट्रध्वजाला
करितो वंदन
शूरवीर जवान अन्नदात्या किसानाला

भारतमातेचे दोन पुत्र
देशसेवेत वाहुन घेती स्वतःला
 एक वाचवितो देश भूमीला
एक जगवितो देशाला

हिमगिरी सागरकिनारी
असो कोणती प्रसिध्द नगरी
या भूमीत पाय ठेवील काय वैरी 
करुनी छाताडावर बंदुकीची फैरी
गाडील मातीत दुश्मनाला 
सलाम या भारतमातेच्या सुपुत्राला
शूरवीर जवानाला

मातीमध्ये गाळूनी घाम
करितो कष्टाची कामं
करुनी रक्ताचं या पाणी
पिकं पिकवितो मोत्यांवाणी
असा जगाचा पोशिंदा शेतकरी 
जगवितो साऱ्या जगाला
सलाम या भारत मातेच्या सुपुत्राला
अन्नदात्या किसानाला

तुम्ही आम्ही देशाचे सुपुत्र
देशासाठी कार्य करू
देशसेवा जागी ठेऊन मनात 
देशसेवेत वाहून घेऊ
करू देशाच्या जवानांचा आदर
देऊ जगाच्या पोशिंद्याला आधार
करुनी सलाम भारतमातेला
देश सेवेत वाहून घेऊ स्वतःला

भारतभूमी आमुची शान
जय जवान जय किसान 
चला करू एकच नारा
करू सुंदर भारत देश हा सारा

जय हिंद.... जय महाराष्ट्र...



मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

प्रेम आंधळं असतं ते असं ...!!!




मी जेव्हा तिला पाहिलं
 तेव्हा नकळत प्रेमात पडलो 
आणि तिचे गोड गुलाबी सौंदर्य न्याहाळत बसलो
 तिच्या सौंदर्यावर मोहित झालो
 मला पाहून ती हसली
 मला वाटलं आता कळी फसली
 म्हणून मी रोज येता-जाता पाहू लागलो
 मला पाहून तिचं सौंदर्य आणखीच फुललं
आणि एके दिवशी ते सुकून गेलं
 तेव्हा ते गुलाबाचं फुल होतं हे मला कळलं 
म्हणतात ना प्रेम आंधळ असतं
ते असं ....!!!

- राहुल बिचकुले

मकर संक्रांत विशेष





मकर संक्रांत
निसर्गाने जीवसृष्टीला दिलं एक वरदान
आला आला मकर संक्रांतीचा सण
सूर्याचे झाले मकर राशीत आगमन
सुरू झाले आता उत्तरायण
आता होईल अंधारातून प्रकाशाकडे प्रयाण
सूर्य करील अंधकारावर आक्रमण

देवही होतील जागे झोपेतून
धुरकट अंधुक भयदायक जिवन
नेई माणसाला मृत्यूकडे ओढून
उत्तरायणात यावे तेजस्वी प्रकाशमय मरण
जप करिती हिंदु धार्मिक महान विद्वान

संक्रांती म्हणजे संघ क्रांती महान
संघटनेत होईल मोठी शक्ती निर्माण
विजय मिळविणे नाही कठीण

घ्यावी स्नेहीजनांची भेट
हाती तीळ गुळाचे ताट
द्यावी मनाची स्निग्धता हृदयाचा गोडवा
मैत्रीच्या नात्यात आपुलकी वाढवा

निसर्ग नियमानुसार येती वनस्पती फळ
उपटून टाकती रोगराईचे मूळ
स्नेह देतो तो तीळ
गोडवा निर्माण करतो गूळ

तीळ गुळाचा लाडु केला
स्नेहीजनांना तो दिला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
दुखवू नका कोणाच्या मनाला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
दुखवू नका कोणाच्या मनाला!!!


मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....!!!
- राहुल बिचकुले

सोमवार, १३ जानेवारी, २०२०

आयुष्यात प्रेम एकदा तरी करावं.... प्रेमापुढे व्यर्थ सगळं काही



आयुष्यात प्रेम एकदा  तरी करावं
प्रेमासाठी जगावं
प्रेमासाठी मरावं...

प्रेम आहेच इतकं अनमोल
ज्यानं प्रेम केलं त्यालाच माहीत त्याच मोल
प्रेम असतं इतकं मजबूत
माया, ममता, धाडसाने भरलेलं
आणि आपुलकीच्या भावनेनं मोहरलेलं

प्रेम एक असं नातं आहे
आपुलकीच्या धाग्याने जोडलेलं
स्वप्नांच्या ताऱ्यांनी सजलेलं 
एकमेकांसाठी आसुसलेलं
प्रेमळ विचारांनी गजबजलेलं

प्रेम असतं खुप भारी
प्रेमापुढे फिकी दुनियादारी
एकमेकांना शब्द देणं
एकांतात मिठीत घेणं 
प्रेमानं बोलणं
हातात हात घेऊन चालणं 
प्रेम देतं आश्वासनं
मी तुझाच तू माझीच
आता फक्त एकमेकांसाठी जगणं

खरंच प्रेम प्रेम असतं 
जीवाला ओढ लावतं
मनाला वेड लावतं
त्याच्या / तिच्या वाटेकडे डोळे लावून पाहायला लावतं
तो / ती नाही आली तर मनातल्या मनात रडायला लावतं

प्रेम रम्य मोहक असतं
ते नजरेनं होत असतं
रंग, रूप आणि स्वभाव यांचं मिलन असतं 
प्रेम खरंच आंधळं असतं
प्रेम ठरवून होत नसतं
प्रेम हृदयातून होत असतं

प्रेम एक वेगळंच विश्व आहे
जणु उमलणारं फुल आहे 
नकळत होतं असणारी भुल आहे
प्रेम काहीही करायला लावत
एकमेकांसाठी झुरायला लावतं 
वेळप्रसंगी मरायला लावतं
प्रेम जगायला शिकवत 
प्रेम झुकायला शिकवतं
प्रेम शिकवतं आणखी काही
प्रेमापुढे व्यर्थ सगळं काही
प्रेमापुढे व्यर्थ सगळं काही !!!

- राहुल बिचकुले



बुधवार, १ जानेवारी, २०२०

सुंदर मन


माणसाचे मन सुंदर असेल तर विचारही सुंदर राहतील.
आणि अशी सुंदर माणसं सर्वांच्या हृदयात राहतील...
            लेखक - राहुल बिचकुले

सखे जाऊदे ना ग सार ( नववर्ष शुभेच्छा )


नमस्कार ,
माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या माझ्या ब्लॉग वाचक प्रेक्षक मित्र मैत्रिणी आपणा सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.....
सर्वांना हे नवीन वर्ष सुंदर, आरोग्यदायी, आनंदी, यशाने भरलेले आणि पूर्णपणे उत्साहाच्या महासागराने व्यापलेले असे जावो हि माता भवानी, शिवचरणी प्रार्थना .....
तुमचे असेच प्रेम आशीर्वाद सतत राहो
आणि माझ्या या मनातून काव्य निर्झर सदा पाझरत राहो..!!!
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा .... एक / एक / वीस वीस --- आपोआप आलेला वन्समोअर  




सखे
सखे जाऊदे ना ग सारं
जुनं वर्ष आता संपल ना पार
आता येईल बग नवं वर्ष
होऊदे मनाला तुझ्या हर्ष

जुन्या वर्षात झाल्या असतील चुका
दिल्या असतील प्रेमात आणा भाका
आश्वासनं माझी कधी झाली नसतील पुरी
जुन्या वर्षासाठी प्रेमानं बोलतो ना ग सॉरी

वर्षाची सुरुवात आजही आठवते
काय सुंदर सुरुवात किती सुंदर दिवस होते
कधी झाली असेल चूक, कधी फुगले तुझे गाल
हेच कळल नाही ना मला, आता बिघडला ना ताल

प्रेमाचं हे काव्य, ना राहिला बग सुर
रुसव्या फुगव्यात जीवन आता वाटत बेसुर
जुनं वर्ष संपलं आता विसरू बघ सारं
नव्या वर्षाची सुरुवात करूया सुंदर
नव्या वर्षाची सुरुवात करूया सुंदर 


 

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...