थोर विचारांची करू देवाणघेवाण
जयंती म्हणजे आनंदाचा सण
निसर्गाचे आपल्यावर ऋण
त्यात उतराई म्हणुन
करू वृक्ष संवर्धन
हाच वसा शिरसावंद्य मानुन
कार्य करील
#नाथ_देवराई_फाउंडेशन
माणकोबावाडा यवत येथे वृक्षप्रेमी युवा कार्यकर्ते एकत्र येत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधत एक नाविन्यपूर्ण सोहळा व्हावा यासाठी या तरुणांनी वृक्षसंवर्धनाचे कार्य आपल्या हातुन घडावे म्हणून हरीतवारी फाउंडेशन कडुन प्रेरणा घेऊन माणकोबावाडा यवत येथे नाथ देवराई फाउंडेशन ची स्थापना करून वृक्षारोपण केले.
यामध्ये वड, पिंपळ, चिंच, लिंब, करंज, बकुळ, कांचन ही झाडे आहेत.
सध्याच्या परिस्थितीचा विचार करून गर्दी टाळून साध्या पध्दतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर माणकोबावाडा येथे श्री सिद्धनाथ मंदिर परिसर, खंडोबा मंदिर परिसर, आणि भिवाई माता मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी पोपट लकडे, दत्तात्रय पिंगळे, राहुल बिचकुले, हनुमंत बिचकुले, आकाश बिचकुले, प्रशांत पिंगळे आणि विशाल खताळ या युवकांनी पुढाकार घेऊन जोगेश्वरी ग्रुप आणि माणकोबावाडा ग्रामस्थांच्या मदतीने भविष्यात नाथ देवराई फाउंडेशन कडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येईल असे मत व्यक्त केले.
याचप्रमाणे तरुणांनी पुढाकार घेऊन असे कल्पक प्रयोग करून जयंती व सण उत्सव साजरे केले तर सर्वत्र हिरवाई दिसेल आणि समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण होईल. म्हणूनच तरुणांनी आपल्या कल्पना व शक्तीचा उपयोग समाज हिताचे कार्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
साध्या पद्धतीने निसर्गाप्रती आदर ठेवत वृक्षारोपण करून माणकोबावाडा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली


Nice
उत्तर द्याहटवा