गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

majhe man
माझे मन ( काव्य ३ )

पर्यावरणाचा विचार 

करता पर्यावरणाचा विचार 
प्रदुषणाचा सहन होईना भार 
विचार करीना कारखानदार 
तयार करतोय प्रदुषण सारं 

माणुस झाला लय स्वार्थी 
वाट लावली पर्यावरणाची पुरती 
गंगा नदीचे महात्म्य थोर 
काठावरी काशीविश्वेश्वर 
येती भक्तगण फार 
वाढलाय उद्योग व्यापार 
जल प्रदूषित केलय सारं 

माणसा आता तरी विचार कर 
सहन होईना प्रदुषणाचा भार 

माणसाच्या हौसेला मोल फार 
घेतली फिरायला मोटार कार 
सोडते हवेत सारा धूर 
वायु प्रदुषण वाढवलंय फार 

माणसा प्रदूषणाचा विचार कर 
सहन होईना प्रदुषणाचा भार 

सध्याच्या युगाचा करा विचार 
लोकसंख्या वाढलीया फार 
नाही जागा उरली धरणीवर 
माणुस झाला स्वार्थी फार 
करतो जंगलावर वार 
झाडे तोडली त्याने फार 

माणसा पर्यावरणाचा विचार कर 
सहन होईना प्रदुषणाचा भार 

नाही केलास पर्यावरणाचा विचार 
तुच प्रदुषण वाढवलय फार 
तु नाही केला पर्यावरणाचा विचार 
तर तुझा कोण करील विचार 
निसर्गाचा कोप होणार 
मग तु रे  कसा जगणार 

माणसा पर्यावरणाचा विचार कर 
सहन होईना प्रदुषणाचा भार 

आता वेळ नाही फार 
निर्णय घे तु लवकर  
एके दिवशी इंधन साठा सारा संपणार 
बंद पडेल तुझी मोटार कार 
नाही मग तुला कोणी विचारणार 

माणसा पर्यावरणाचा विचार कर 
सहन होईना प्रदुषणाचा भार 



© कवी. राहुल दादा बिचकुले 


नमस्कार मित्रांनो...

पर्यावरण म्हटलं कि आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करू लागतो. तेव्हा नकळत जाणवते कि हि सृष्टी हा निसर्ग सारे जीव जंतु आणि यामध्ये महत्वाचा असणारा जीव म्हणजे माणुस. हे सर्व या सृष्टीमध्ये सामावलेले आहेत. परंतु या सुंदर सृष्टीला सुंदर करणारा आणि तिचे सौंदर्य हिरावुन घेणारा जीव हा माणूसच आहे. आणि या माणसाने या सृष्टीला प्रदुषणापासुन वाचवले पाहिजे म्हणून हि कविता सादर केली आहे. यामध्ये मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या प्रदुषणाचे वर्णन केलेले आहे. त्यामुळे माणसाने आपल्या या सुंदर सृष्टीला जपले पाहिजे. कारण वाढता प्रदुषणाचा भार आता तिला सहन होत नाही.

1 टिप्पणी:

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...