असा एक तो वीर
आद्य स्वातंत्र्य वीर
अजिंक्य महायोद्धा
चक्रवर्ती महाराजाधिराज
रणझुंजार कार्यधुरंधर
चक्रवर्ती सम्राट महाराजा
श्रीमंत यशवंतराव होळकर
काय वर्णावी तयाची महती
जगामध्ये अजरामर किर्ती
शत्रु मनी भरली भीती
इतिहासाची पाने साक्ष देती
मराठी अस्मितेचा हुंकार
भगवे निशाण फडकाविले
दिल्ली तख्तावर
तेजोमय उत्तर हिंदुस्थानी
केला कारभार
राज्य गाजविले सर्वांच्या मनावर
लढा स्वातंत्र्यासाठी उभारला
जनसामान्य मावळा एक केला
कधी कुणापुढे ना झुकला
सलाम या अजिंक्य महायोध्याला
तुम्हीच प्रेरणा
तुम्हीच ताकद आमुची
तुम्हीच अभिमान
तुम्हीच शान आमुची
करितो वंदन
आज स्मृतीदिनी
अखंड स्मृतीदीप
तेवत राहील मनी
कोणापुढे झुकणार ना कधी
रुजवील तुमचे विचार मी मनामधी
वंदन माझे महाराष्ट्राच्या राजाला
छत्रपती शिवाजी राजाला
वंदन माझे बा मल्हारबाला
त्यांच्या थोर कर्तुत्वाला
वंदन माझे पुण्यश्लोक राजमातेला
श्रद्धास्थान राजमाता अहिल्यादेवींना
करितो नमन थोर संत महापुरुषांना
त्यांच्या थोर विचारांना
स्मृतीदिनी वाहतो शब्द पुष्पांजली
प्रेरणास्थान महानायकाला
थोर श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर
यांच्या पुण्य स्मृतीला
आद्य स्वातंत्र्यवीर अजिंक्य महायोद्धा महाराजाधिराज श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर स्मृतिदिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा.....
आद्य स्वातंत्र्यवीर अजिंक्य महायोद्धा महाराजाधिराज श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर जयंतीनिमित्त सर्वांना खुप खुप शुभेच्छा.....
शुभेच्छूक : कवी राहुल दादा बिचकुले
माणकोबावाडा यवत - ८८८८८९७५३३
bichkulerahul3@gmail.com