जो राजा तोच आदेश करी
ज्याच्याकडे सत्ता तो राज करी
राजा राजाचं युध्द
युद्ध संपता होती एक
प्रजेचं लागलं भांडण
वैर पेरती जन्माचं
कुणी लावतात घोडं
कुणी पाठवी स्मशानात
विरोधकांच्या काय नशिबात
दिवस काढावे लागतात सुतकात
आरं कसलं हे राजकारण
हार जितीचा हा खेळ
युध्द लढणारे दोन वीर
बसवितात पुन्हा मेळ
हे कधी कळेल प्रजेला
झालं तिथं सोडुन देणं
भाऊबंदकी शेजारी पाजारी
पुन्हा गुण्यागोविंदाने एक येणं
नाही समजणार यांना कधी
पार बुडाले राजकारणामधी
नाती गोती शेजारी पाजारी
विरोधक झाले सारे बांधकरी
कशाला हवं हे राजकारण
नेते राहतील सुखात
कार्यकर्ते करून भांडण
घरं बुडवतील दुःखात
आता तरी सावध व्हा
राजकारणाकडे राजकारण म्हणुन पहा
आपला नेता म्हणुन थोडं वेगळं रहा
होता निवडणूक पुन्हा प्रेमानं एकत्र या
होता निवडणूक पुन्हा प्रेमानं एकत्र या
एक सामाजिक कार्यकर्ता : कवी : राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी