मंगळवार, ३१ मार्च, २०२०

कोरोनाशी लढा




जरी कोरोना व्हायरस आलंय चायना वरून
हे युद्ध लढायचं आपल्याला आपल्याच घरून

आपला भारत देश महान
आपण भारताचे जवान
देशसेवेची नामी संधी
आज आलीया चालुन
हे युद्ध लढायचं आपल्याला आपल्याच घरून

शासन प्रशासन डॉक्टर नर्स
पोलीस लष्कर मिडियावाले
यांचे मानुया आभार
अत्यावश्यक सेवेसाठी
घेतला देशपुत्रांनी आपल्या
खांद्यावर भार
करू सहकार्य हेच कर्तव्य
आता गर्दी टाळून
हे युध्द लढायचं आपल्याला आपल्याच घरून

घेऊ हाती शस्त्र जपू आरोग्य मंत्र
जर असेल सर्दी खोकला
घेऊ आपण वैद्यकीय सल्ला
मास्क लावूया तोंडाला
सामोरे जाऊ उपचाराला
नको भीती जगु आंनदी जीवन
आता मागे लागु कोरोनाच्या
आपले हात स्वच्छ धुवून
हे युध्द लढायचं आपल्याला आपल्याच घरून

सुरू झाले जीवयुद्ध
घातला जगाला विळखा
जरी मंदिरे बंद झाली
देव नाही हो झोपला
मंदिराचे रूप दवाखान्याला
डॉक्टर देवदूत हो झाला
आता फक्त पाहिजे आपली साथ
सर्वांना प्रेरणा दयावी घरून
हे युध्द लढायचं आपल्याला आपल्याच घरून

आता फक्त एकच करायचं
आपण घराबाहेर नाही पडायचं
आपले आरोग्य आपण जपायचं
शासन प्रशासन जे सांगतील ते ऐकायचं
आणि आपल्या कुटुंबासाठी हिमतीने जगायचं
आतापासून माणूस आहे माणूसकीने वागायचं
आपलं हे रोजचं वागणं पाहून
कोरोना जाईल भिऊन
हे युध्द लढायचं आपल्याला आपल्याच घरून

सर्व या संकटाशी दोन हात करणाऱ्या देशपुत्रांचे आभार.
व सर्वांना एक कळकळीची विंनती आपण सर्वजण मिळूनच हे संकटं पळवुन लावू शकतो. त्यामुळे सर्व शासन आदेश पाळा.
मी घरी आहे
आपणही घरी रहा.
आरोग्याची काळजी घ्या
देशहितासाठी कार्य करतोय
घरीच राहून कुटुंबासाठी देशासाठी जगा
माणूस आहे आपण माणुसकीने वागा

कोरोनाला जंतू समजून निष्काळजीपणाने वागू नका
आपण स्वतःला व कुटुंबाला धोक्यात आणू नका
त्यामूळे घरी बसा

© राहुल दादा बिचकुले
यवत, माणकोबावाडा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...