रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

सख्या सजना दिलबरा (लावणी)

सख्या सजना दिलबरा
घेऊन चला हो मज आपुल्या घरा ||धृ||

ओढ तुमची छळते राया
तुमच्या ओढीनं सुकली काया
कसे सांगु मनातलं तुम्हा दिलबरा
घेऊन चला हो मज आपुल्या घरा ||1||

मनी विचारांचं उठतं काहूर
विरह वाढतो मनी वाटते हुरहूर
कधी होईल भेट आपुली दिलबरा
घेऊन चला हो मज आपुल्या घरा ||2||

सख्या सजना तुम्हीच माझे
भेटुन मज उतरवा विरहाचे ओझे
यावे भेटीस आता तुम्ही दिलबरा
घेऊन चला हो मज आपुल्या घरा ||3||

कवी. राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...