मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२

राया तुम्ही हो बोलु नका मधाळ

आली दिवाळी करू फराळ
राया तुम्ही हो बोलु नका मधाळ | धृ |
बोल तुमचे मधावानी
घेऊनी देतो चल पैठणी
असेच तुम्ही वचन देऊनी
घेतली नाही माघे पैठणी

या वर्षाला तुमचे काही
मी आता तर ऐकणार नाही
नका नेऊ तुम्ही मारुनी वेळ
राया हा तर आनंदाचा काळ ..

आली दिवाळी करू फराळ
राया तुम्ही हो बोलू नका मधाळ

या दिवाळीच्या सणाला
पाहुणे येतील आपल्या घराला
द्या पैठणी घेऊनी मला
आनंद होईल माझ्या मनाला

लाडू चिवडा करंजी केली
केली तुम्हासाठी कुरकुरीत चकली
राया तुमचे मन निर्मळ
घेतली पैठणी आंनद निखळ

आली दिवाळी करू फराळ
राया तुम्ही हो बोलू नका मधाळ

कवी. राहुल दादा बिचकुले
यवत, दौंड, पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...