गुरुवार, २९ जून, २०२३

जन्मोजन्मी वारी माझी होऊदे...

ना तुझं आमंत्रण
ना निरोप धाडीला
आस तुझी पांडुरंगा
घेऊन जातीया वारीला

संकटाची भीती नाही
ना कसली मोहमाया
विसरून जातो देहभान
माझ्या कुटुंबावर तुझीच छाया

वारीच्या या वाटेवर
ना कसला क्षीणभार
चालतो मी भरभर
माझे पंढरी माहेर

मुखी नाम हरीचे
रूप दिसे माऊलीचे
भेद जळतो मनातला
आम्ही वारकरी पंढरीचे

आषाढी एकादशी सोहळा
नाचे वैष्णवांचा मेळा
फिरता तेथुन माघारी
अश्रु वाहे घळाघळा

आस तुझी पांडुरंगा
सदा मनी माझ्या राहूदे
नको मज तुझे काही
जन्मोजन्मी वारी माझी होउदे
जन्मोजन्मी वारी माझी होउदे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...