पूर्वीचा काळ आठवला कि आठवतं आपल्याला पाण्याचं मुबलक प्रमाण होतं आणि त्यावेळी जल स्रोत कमी प्रमाणात होते परंतु जेव्हा केव्हा आपण जलस्रोताचे साधन विहीर किंवा बोअरवेल घेण्याचा प्रयत्न करू त्यावेळी त्याला भरपूर पाणी लागायचे अशा काही त्यावेळच्या विहरी बोअरवेल पाहिल्या कि जुनी माणसं सांगतात अमाप पाणी असणारी हि विहीर हे बोअरवेल आता उन्हाळा सुरु व्हायच्या आधीच आटत आहेत. आणि नवीन विहीर किंवा बोअरवेल पूर्णपणे कोरडे जात आहेत. याला कारण काय असेल याचा थोडा शोध घेतला पाहिजे. तर उत्तर मिळेल भुगर्भातील पाणी साठा आता कमी झाला आहे. मग आता हि वेळ असेल तर भविष्य किती कोरडेठाक्क असेल याचाही थोडा विचार करायला हवाच...
थोडंसं मागे जाऊन पाहिलं तर डेव्हलपमेंट नावाचा हा सुधारित प्रकार त्यावेळी नव्हता तेव्हा जीवन सुखर होते पण माणसाने प्रगतीच्या नावाखाली डेव्हलपमेंट हा प्रकार उदयास आणला आणि स्वतःच्या दुःखद जीवनाच्या प्रवासाची पायवाट निर्माण केली आता या पायवाटेचा महामार्ग होऊ पहात आहे आणि माणुस दुष्काळ नावाच्या एका भीषण संकटात ओढला जात आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे.
थोडंसं सविस्तर बोलू या विषयावर आणि ते गरजेचं आहे. पूर्वी चिंचा, आंबे, बोरं खायला आपण नक्की ओढ्या नाल्याच्या काठावर गेला असताल. त्यावेळी असणारी ती मज्जा आताची पिढी अनुभवेल हे स्वप्नात पहावं लागेल. छोटे छोटे ओहळ त्याचे मिळून झालेले ओढे आणि ओढ्यांना आडवण्यासाठी नाले नाल्याच्या शेवटाला तलाव आणि तलावातून वाहून पाणी नदीला जायचं इतपर्यंतचं दृश्य जुन्या पिढीने अनुभवलेलं आहे. आणि नदीचे पाणी धरणात साठवलं जातं आणि सरतेशेवटी ते समुद्राला मिळतं हे पण त्यांनी ऐकलं आहे. किती सुंदर चक्र होतं ते. आता बाजाराशिवाय मासे मिळतं नाही त्यावेळी पावसाळ्यात छोटया ओहळात ही मासे पकडले जायचे हे पण बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल. पण आता ते फक्त स्वप्न दिसत आहे. कारण ना ओहळ राहिले ना ओढे, नाले बुजून गेले आणि तलाव कोरडे दिसू लागले नदीचे स्वरूप ओढ्यासारखे झाले आणि उन्हाळा सुरु व्हायलाच धरणे आटू लागली आणि पावसाळ्याचे दिवस संपताच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या. सुंदर सृष्टी चित्रात दिसू लागली आणि पावसाळ्यात भिजण्याचा आनंद विरून गेला कारण निसर्ग कोपत चालला आहे. आणि पावसाळा कमी होतं आहे मग आता दुष्काळाचं संकट कोणामुळे ओढावलं आहे याचं उत्तर शोधण काळाची गरज बनलेली आहे.
प्रगती हि भविष्यात हि आपली प्रगती म्हणुन राहिली पाहिजे तिला अधोगतीचं स्वरूप नाही आलं पाहिजे. त्यासाठी महत्वाचे साधन म्हणजे पाणी, पाण्याला उगाच जीवन म्हणत नाही कारण पाण्याशिवाय कोणत्याच सजीवाला जगता येत नाही. पाण्याशिवाय कोणतेच काम होत नाही. त्यामुळे पाण्यावर मोठ्या प्रमाणात काम व्हायला पाहिजे. ठिकठिकाणी पाणी आडवून भुगार्भात पाणी साठा वाढवण्यासाठी पाण्याचं पुनर्जीवन केलं पाहिजे. तेव्हाच दुष्काळ नावाचं हे मोठं संकट आपण रोखू शकतो. नाहीतर इकडचे पाणी तिकडे वळवून कित्येक पाण्याच्या योजना राबवून कृत्रिम जलसाठे निर्माण करून पाईपलाईन द्वारे सर्वत्र पाणी फिरवून फक्त तात्पुरते समाधान मिळवू शकतो पण दुष्काळाला तोंड देऊ शकणार नाही हेच अंतिम सत्य असेल तेव्हा पाणी आडवणं हि प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ते काम प्रत्येकाने स्वतःहून प्रामाणिकपणे केलं तरच ते साध्य होईल असं मला वाटतं...!
श्री राहुल दादा बिचकुले
सदस्य नाथदेवराई फाउंडेशन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी