मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८

माझे मन ( माझे विचार माझे सुविचार )
माझे विचार
१  

संस्काराने माणसाचे जीवन घडते ,
तर अहंकाराने माणसाचे आयुष्य बिघडते....
© माझे मन :  राहुल दादा बिचकुले 

२ 
जीवनातील कर्माच्या बिजावर किर्तीच्या फळाचा गोडवा अवलंबून असतो.
© माझे मन :  राहुल दादा बिचकुले

३ 
प्रेम म्हणजे 
दोन अक्षरी शब्द 
दोन जीवांचे मिलन 
दोन क्षणांचा खेळ 
कधी बसतो मेळ 
तर कधी होतो साऱ्या आयुष्याचा घोळ 
                                                                                                         © माझे मन :  राहुल दादा बिचकुले 

माझे मन : २०१३ पासुन 

माझे मन ( काव्य २ ) माणुस जात

..माझे मन ( काव्य २ )

माणूस जात 

माणुस आहे मी माणुस 
 माझीच करता विचारपुस
धर्म माणुसकीचा माझा 
जात माणसाची माझी 
करू नका हो भेदभाव 
माणुस आहे माझे नाव 
माणुस आहे मी माणुस || धृ ||

उच्च निच्चाचा भेद कुणी केला 
माणुस माणसातच जन्माला आला 
कुणी मोठा कुणी लहान 
कुणी झाला महान विद्वान 
कुणी राजा कुणी दास 
माणुस आहे मी माणुस || १ ||

माझे माणसाचे मन 
मला माणुसकीची जाण 
भेद करिती विद्वान 
कुणी मोठा कुणी लहान 
जन्मा घातलं देवांन 
विचार करुनी माणुस 
माणुस आहे मी माणुस || २ ||

जन्मा घातला माणुस 
नाही विचार केला देवांन 
असा विश्वास ठेवुन 
दिलं बुद्धीचं ते दान 
हुशार तो माणुस 
लहान मोठा समजतो एकमेकांस 
माणुस आहे मी माणुस  || ३ || 


© कवी राहुल दादा बिचकुले (Rahul dada bichkule ) 

नमस्कार मित्रांनो...
माणुस जात हि कविता माणसाच वेगळेपण सांगुन जाते. यातून मला हेच सांगायचं आहे कि, मी माणुस तुम्ही माणुस तरी माणुस का करतो जातीची विचारपुस, मी मोठा तू लहान, मी उच्च तू कमी दर्जाचा हा दर्जा ठरविणाराही माणुसच तर का हा भेदभाव माणसाने करावा. देवाने माणसाला बुद्धी दिली ती चुक केली का? तर माणसाने भेदभाव न करता बंधुभावाने राहिले पाहिजे. व जातीपातीचा विचार न करता फक्त माणुस जातीचा विचार केला पाहिजे...
माझे मन ..... माझा काव्यसंग्रह २०१३ पासून काव्यप्रवाहात


माणुस


    माणूस कोण आहे? आणि माणुस म्हणुन कोणाला ओळखले जाते? माणुस अशी कोणती जात आहे का ? असे अनेक प्रश्न सतत सतावत असतात. तेव्हा उत्तरच मिळत नाही.      आजच्या परिस्थितीचा विचार केला किंवा इथुन मागच्या काळात डोकावुन पहिले तर माणुस अशी कोणती जात आहे अशी नोंद नाही. किंवा माणुसकी नावाचा धर्मसुद्धा अस्थित्वात नाही. मुलाला शाळेत घालताना. त्याच नाव विचारलं जात. नावाबरोबर त्याची जात आणि धर्म विचारला जातो. आणि तेव्हाच त्याच्या मनावर असे विचार कोरले जाते कि तो विशिष्ट जातीचा विशिष्ट धर्माचा आहे. आणि सर्वांना माहितच आहे बालमनावर एकदा कोरलं गेल कि ते पुसण आवघड होऊन जात.उदा : बालवयात आपण मुलाला सांगितल ना कि रात्री भुत येत लवकर झोपायचं घराबाहेर जायचं नाही. याचा परिणाम मुल मोठ झाल्यावरही होतच असतो. त्यामुळे त्या काल्पनिक भुताला घाबरून तो आयुष्यभर रात्री भीतभीत घराबाहेर वावरत असतो.     त्याचप्रमाणे त्याच्या मनात आपण बालपणी प्रेरणादायी विचार भरले तर मोठेपणी सुद्धा तो त्याचप्रमाणे कार्य करत असतो.त्यामुळे आपणच बालपणी जातीपातीच्या जाळ्यात मुलांना गुंतवतो. आणि त्यामुळे मुलेही मोठेपणी हि माझी जात आणि हा माझ्या जातीचा हा रंग यातच गुंतुन जातात
    याचे परिणाम आपण माणूस जात विसरून या माणसाने तयार केलेल्या जाती धर्माच्या जाळ्यात गुंतून माणसाच्या विरोधात माणुस उभा राहतो. त्याचे परिणाम म्हणुन वैर निर्माण होत. मी श्रेष्ठ आहे. तू कनिष्ठ आहे या विचारात माणुस हा माणुस आहे हे विसरूनच जातो....!!!  

गुरू

माझे मन ( काव्य १ ) 

गुरु 

जेव्हा मी आलो जन्माला 
तेव्हा कोण गुरु मला भेटला 
ज्यानं मला हो असा घडविला    || धृ ||

माझ्या मुखी उच्चार आला जो पहिला 
नमन माझे ते गृरुसमान आईला 
जिने धरिले बोटाला 
चार पाऊले चालविला 
असा मला हो घडविला 
तोची गुरु माझा पहिला   || १ ||

मुखात उच्चार आई बरोबर बाबा 
कोणत्याही क्षणी पाठीशी खंबीर उभा 
जगण्या वागण्यात ज्यांनी आधार दिला 
नमस्कार माझा त्या गुरुसमान बाबाला 
ज्यांनी मला हो असा घडविला  || २ ||

मी जेव्हा हा समाज पहिला 
जयांन मला शिकवलं समाजात जगायला 
काय सांगू हो त्याच्या रुपाला 
हातामध्ये छडी पेन तो कोटाला 
नमन माझे ते शिक्षकासमान गुरूला 
ज्यांनी मला हो असा घडविला || ३ || 

जेथे मला मार्ग मिळाला 
तोची गुरु माझा झाला  
नमन माझे त्या समाज कुटुंबाला 
ज्यांनी मला हो असा घडविला   || ४ || 

लळा वाचनाचा लागला 
ग्रंथ मी मनान पूजिला 
नमन माझे त्या ग्रंथाला 
ज्यांनी मला हो असा घडविला  ||५ ||

असा गुरु मला भेटला 
मार्ग जगण्याचा दावला 
नमन माझे त्या गुरूला 
ज्यांनी मला हो असा घडविला || ६ ||

जीवनात मान हो गुरूला 
नमन माझे त्या गुरूच्या अदृष्य रुपाला 
गुरु मानिले मी अनुसयेच्या बाळाला 
त्याची महान माझ्या दत्तगुरूला 
जयांन मला हो असा घडविला || ७ ||

© कवी : राहुल दादा बिचकुले .


नमस्कार मित्रांनो... 
                          जीवनात आपण यशस्वी होत असताना.. आपल्या यशाच्या पाठीमागे कोणाचा तरी हात असतो. आणि तो हात म्हणजे आपल्या गुरूचा. आपला जन्म झाला कि आपल्याला चालायला बोलायला शिकविते ती आपली आई हि आपली पहिली गुरु असते. त्यानंतर आपले लाड पुरविणारे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आपले वडील हे आपले दुसरे गुरु असतात. यापुढे आपल्याला ज्ञान घेण्यासाठी शाळेत जावे लागते. तेव्हा आपले शिक्षक एक आदर्श विध्यार्थी बनावा यासाठी मार्गदर्शन करतात.  ते शिक्षक आपले गुरु असतात. त्याच ते आगळवेगळ रूप खरच विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी रुबाबदार असते. या समाजातून आणि आपल्या कुटुंबातून  हि आपल्याला अनेक नाविन्यपूर्ण  गोष्टी शिकायला मिळतात. तो समाज आणि कुटुंब  नकळतपणे आपले गुरु होऊन जातात.  आता एक महत्वाचा गुरु म्हणजे जो आपल्याशी कधीच बोलत नाही तो ग्रंथ हा आपला गुरु असतो. तो निस्वार्थी पणे ज्ञानदानाच कार्य करत असतो. असे अनेक गुरु माणसाच्या आयुष्यात येतात आणि एक एक गुण वाढवत माणसाला आदर्श बनवण्याचे कार्य करतात.
      माझ्या जीवनात या सर्व गुरूंना आदराचे स्थान आहे. त्याचबरोबर एक अदृष्य गुरु माझ्या जीवनात अनमोल कार्य करत आहे. मी लहान असताना त्या माझ्या गुरूची सेवा करायचो तो गुरु म्हणजे अत्रीअनुसया पुत्र गुरदेव दत्त आजही ते माझे मन म्हणून कार्य करतात. म्हणजे मी लहानपणापासुन माझ्या मनाने जो चांगला आदेश दिलेला असतो. तो माझ्या गुरुदेवने दिला आहे असे मी समजतो. 

माझ्या सर्व गुरूंना माझी हि कविता समर्पित करतो......
 माझे मन... माझा काव्यसंग्रह २०१३ पासून काव्यप्रवाहात  

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...