..माझे मन ( काव्य २ )
माणूस जात
माणुस आहे मी माणुस
माझीच करता विचारपुस
धर्म माणुसकीचा माझा
जात माणसाची माझी
करू नका हो भेदभाव
माणुस आहे माझे नाव
माणुस आहे मी माणुस || धृ ||
उच्च निच्चाचा भेद कुणी केला
माणुस माणसातच जन्माला आला
कुणी मोठा कुणी लहान
कुणी झाला महान विद्वान
कुणी राजा कुणी दास
माणुस आहे मी माणुस || १ ||
माझे माणसाचे मन
मला माणुसकीची जाण
भेद करिती विद्वान
कुणी मोठा कुणी लहान
जन्मा घातलं देवांन
विचार करुनी माणुस
माणुस आहे मी माणुस || २ ||
जन्मा घातला माणुस
नाही विचार केला देवांन
असा विश्वास ठेवुन
दिलं बुद्धीचं ते दान
हुशार तो माणुस
लहान मोठा समजतो एकमेकांस
माणुस आहे मी माणुस || ३ ||
© कवी राहुल दादा बिचकुले (Rahul dada bichkule )
नमस्कार मित्रांनो...
माणुस जात हि कविता माणसाच वेगळेपण सांगुन जाते. यातून मला हेच सांगायचं आहे कि, मी माणुस तुम्ही माणुस तरी माणुस का करतो जातीची विचारपुस, मी मोठा तू लहान, मी उच्च तू कमी दर्जाचा हा दर्जा ठरविणाराही माणुसच तर का हा भेदभाव माणसाने करावा. देवाने माणसाला बुद्धी दिली ती चुक केली का? तर माणसाने भेदभाव न करता बंधुभावाने राहिले पाहिजे. व जातीपातीचा विचार न करता फक्त माणुस जातीचा विचार केला पाहिजे...
माझे मन ..... माझा काव्यसंग्रह २०१३ पासून काव्यप्रवाहात
माणूस कोण आहे? आणि
माणुस म्हणुन कोणाला ओळखले जाते? माणुस अशी कोणती जात आहे का ? असे अनेक प्रश्न
सतत सतावत असतात. तेव्हा उत्तरच मिळत नाही. आजच्या परिस्थितीचा विचार केला किंवा इथुन
मागच्या काळात डोकावुन पहिले तर माणुस अशी कोणती जात आहे अशी नोंद नाही. किंवा
माणुसकी नावाचा धर्मसुद्धा अस्थित्वात नाही. मुलाला शाळेत घालताना. त्याच नाव
विचारलं जात. नावाबरोबर त्याची जात आणि धर्म विचारला जातो. आणि तेव्हाच त्याच्या
मनावर असे विचार कोरले जाते कि तो विशिष्ट जातीचा विशिष्ट धर्माचा आहे. आणि
सर्वांना माहितच आहे बालमनावर एकदा कोरलं गेल कि ते पुसण आवघड होऊन जात.उदा : बालवयात आपण
मुलाला सांगितल ना कि रात्री भुत येत लवकर झोपायचं घराबाहेर जायचं नाही. याचा
परिणाम मुल मोठ झाल्यावरही होतच असतो. त्यामुळे त्या काल्पनिक भुताला घाबरून तो
आयुष्यभर रात्री भीतभीत घराबाहेर वावरत असतो. त्याचप्रमाणे त्याच्या मनात आपण बालपणी
प्रेरणादायी विचार भरले तर मोठेपणी सुद्धा तो त्याचप्रमाणे कार्य करत असतो.त्यामुळे आपणच
बालपणी जातीपातीच्या जाळ्यात मुलांना गुंतवतो. आणि त्यामुळे मुलेही मोठेपणी हि
माझी जात आणि हा माझ्या जातीचा हा रंग यातच गुंतुन जातात
सुंदर काव्य
उत्तर द्याहटवा