कुठं लिहलं तुझं नाव
मला आठवतं नाय ग
आठवणींची वही उचकता
आठवण येती माझी तुला काय ग
नकळत हातांनी उचकल गेलं पान
पानाकडे पाहता बहरून गेलं मन
निळया लाल शाईनी नाव तुझं कोरलं
या वही कडं पाहता डोळ माझं भरलं
खरंच एवढं का आठवाव मी तुला
तुझी माझी भेट झाली सोडून गेली शेवटच्या वर्षाला
पण आजही आठवतात त्या आठवणी
ज्या दडवल्या मी सातपडद्याआड मनी
तुझी माझी भेट होता ग योगायोग
पण म्हणतात ना नशीबाचे कोणा ना चुकले भोग
त्यात तुझा न माझा नंबर लागला
जवळ आलो दोघे सुट्टी लागली कॉलेजला
खूप काही बोलायचं होत
प्रेमात मन तोलायच होत
बोलू ना शकलो तोलू ना शकलो
फक्त नाव तुझं वहीत मात्र लिहू शकलो
आठवतात आजही त्या आठवणी
डोळ्याच्या कडा भरत्यात पाण्यानी
कारण हेच डोळे होते साक्षीला
जे एकटक पाहत होते तुला
या डोळ्यांना तुझ्या डोळ्यांची समजली होती भाषा
जे सांगत होते दोघांनाही आपल्या वागण्याची दिशा
हिच दिशा मी जोखली वहीत अलगद झाकली
आज वही सापडली आठवण माझी जागी झाली
© कवी राहुल बिचकुले




