सोमवार, २२ एप्रिल, २०१९

मी वसुंधरा करी विनवणी जीव गुदमरतो आहे



जागा हो माणसा
माझा श्वास कोंडतो आहे
मी वसुंधरा करी विनवणी
जीव गुदमरतो आहे

ठेव दूरदृष्टी
संपतेय सृष्टी
पाठीवर भार वाढतो आहे
सिमेंटच्या जंगलाचा व्याप वाढतो आहे

तुझ्या विनारे मी जगेन
माझ्याविना तुझं अवघड जिणं
सृष्टी रक्षणाचा हा संकेत आहे
माझे रक्षण आता तुझ्याच हाती आहे

तोडली सारी वृक्ष वनराई
माझ्या जिवाची होती लाही लाही
तापमान हे वाढतच आहे
शोधा उपाय नाहीतर सजीव सृष्टी होरपळणार आहे

सजीवांमध्ये मनुष्य महान
त्यासी मिळाले बुद्धीचे वरदान
सृष्टी सारी तुच नष्ट करीत आहे
विनाशाचा नवा सापळा रचत आहे

चला आता एकी करूया
वसुंधरेला आपण वाचवुया
उपाय याला एकच आहे
वसुंधरेला हिरवा शालू दिला पाहिजे

झाडे लावु झाडे जगवु
वसुंधरेचा तोल सावरू
पाणी आडवु पाणी जिरवु
हरित वसुंधरा आपण करू

© कवी : राहुल दादा बिचकुले

आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सर्वांना विनंती आपल्याल्या जगायचं असेल तर पृथ्वीला जगवल पाहिजे. जीवसृष्टी जगवली पाहिजे. त्यासाठी झाडे लावा झाडे जगवा. वनराई जपा जीवसृष्टी जपा. त्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा. आपल्या वसुंधरेच रक्षण करा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...