नववर्षाची लागली चाहुल
चैत्र पालवी टाकते पाऊल
चला दारी गुढी उभारूया
नवा संकल्प मनी करूया
कलश प्रतीक मांगल्याचे
करू संवर्धन संस्कृतीचे
प्रतीक महान लिंब डहाळी
निसर्ग संवर्धनाची देऊ आरोळी
रोगराईची उपटु मुळी
गोड साखरेची बांधुन गाठी
एकत्र येऊनी करू क्रांती मोठी
भक्तीने करूया शालू अर्पण
स्त्री शक्तीचा करू सन्मान
गुढी उभारण्या उंच काठी
प्रयत्न करूया जनहितासाठी
करूया पूजा गंध अक्षता वाहुन
निसर्ग रक्षणाची गुढी उभारून
हाच संकल्प मनी धरा
या वर्षात सर्वांनी वृक्षारोपण करा
झाडे तोडुनी, प्रदूषण वाढवुनी
काय कोणी मिळविले ?
पुर, दुष्काळ, वादळात
सर्वस्व गमाविले....!!!
थांबवुया हे सारे आपण
करुनी पुन्हा वृक्षारोपण
झाडे लावु झाडे जगवु
वसुंधरेला पुन्हा सजवू
पर्यावरणाच्या गुढीसंगे
करू नववर्षाचे स्वागत
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
लेखक / कवी : राहुल दादा बिचकुले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी