रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

रानातली लोक दैवत

भुलेश्वर डोंगरातील दैवत 

उघड्या बोडक्या माळरानी
शेताच्या बांदावरी
रात असो वा दिस
देव म्हसोबा राखण करी

ओढे नाले असो दाट वनराई
तिथे राहते माता मावलाई
काय सांगु आईची नवलाई
लेकीबाळींची तीच आई

दाट वनात आड रानात 
गावाच्या शिवेवरी
बसून आई सटवाई 
लहान थोरांची राखण करी

अशीच रानावनात
प्रत्येकाच्या मनामनात
रानातली हि दैवतं
देती मनाला ताकद अशी हि लोक दैवतं
अशी हि लोक दैवतं

कवी: राहुल दादा बिचकूले

 

1 टिप्पणी:

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...