कवी कठोर मनाचा
कधी मुलायम काळजाचा
काव्यातून व्यक्त होतो
आपले दुःख सांगतो
पण रडणार नाही कधी
कुणाच्या खांद्यावर ओझे देऊन
त्याच्या जवळचं नातं एकच
त्याची ती कविता
दुःखाचा पाझर
कवितेतून ओसंडून वाहील
सुखाचा निर्झर ओथंबत राहील
पण आपले दुःख कोणापाशी
कधी व्यक्त करणार नाही
विशाल हृदय असतं त्याचं
हजारोंची दुःख त्यात
असतात सामावलेली
दुसऱ्याचे दुःख मांडत असताना
त्याला आपल्या दुःखाची झालर लावून
तो व्यक्त होतो कवितेतून
इच्छा झाली जरी
आपलं दुःख कुणाजवळ व्यक्त करण्याची
बोलून मनातलं सारं
मोकळा उसासा सोडण्याची
हक्काच्या माणसाजवळ
मन भरून रडण्याची
अश्रु पुसत गालावरचे
खळखळून हसण्याची
तरी तो सहजासहजी
बोलणार नाही कुणापाशी
कारण स्वतःच्या दुःखाबरोबर
इतरांचे दुःखही त्याने
साठवलेले असतात मनात
म्हणुन तो बोलत नाही कुणाजवळ
व्यक्त होतो कवितेत
जरी वाटली पुसून टाकावी
विचारांची गर्दी मनातली
जीवाची गुसमट करणारी
सारी जळमटं काळजातली
तरी तो तसा करीत नाही
इतरांचे दुःख म्हणून
स्वतःची सारी दुःख
मांडतो आपल्या कवितेत
आणि मोकळं करतो मनाला
जगाची दुःखे सामावून घेण्यासाठी....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी