शुक्रवार, ६ मे, २०२२

प्रेम केलं प्रेम केलं....

प्रेम केलं प्रेम केलं
माझा कोणता गुन्हा
प्रेमात या धोका झाला
प्रेम करणार नाही पुन्हा...

झुरलो दिनरात
रमलो स्वप्नात
सजवलेली वरात
घेऊनी तिच्या अंगणात

आमच्या या स्वागताला
बाप भाऊ उभाच दारात
तिचा होता होकार
आज उत्तर मिळाले नकारात

विरजण पडले आनंदावर
वरातीचे घोडे झाले फरार
स्वागताचे फटाके
फुटले आमच्याच बुडावर

असं हुड वयाचं हे प्रेम
प्रेम होतं का ते समजेना
कमी वयात शहाणा झालो 
प्रेम करणार नाही पुन्हा

प्रेम केलं प्रेम केलं
माझा कोणता गुन्हा
प्रेमात या धोका झाला
प्रेम करणार नाही पुन्हा...!

कवी : राहुल दादा बिचकूले
माणकोबावाडा, यवत. ता. दौंड, जि. पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...