विश्व व्यापक रूप तुझे
माय माऊली राजमाता
पुण्यश्लोक अहिल्यादेवी
गातो तुझ्या पराक्रमाची गाथा
शिंदे घराण्याची लेक तू
झाली होळकरांची सून
नाव गाजविले स्वकर्तृत्वानं
वाटतो आम्हा अभिमान
खंडेरावांची सावली तु
मल्हारबांचा आधार
विश्वाची झाली माऊली
केला स्वराज्याचा राज्यकारभार
स्त्री कर्तृत्व रणी गाजविले
घेऊनी हाती तलवार
स्वराज्य रक्षिण्या तूच
केला शत्रूंचा संहार
शिवरायांचा स्वराज्य वारसा
होळकर शाहीचा झेंडा
स्त्री असुनी रण गाजवुनी
अटकेपार रोविला
धर्म रक्षिण्या उभारली
प्रार्थना स्थळे, घाट, मंदिरे
भूतदया तुच जपली माऊली
उभारली वन उद्याने
तुझ्या कार्याची महती गातो
अभिमान मनी दाटतो
वारसा तुझ्या शौर्याचा
आजही इतिहास सांगतो
कवी : राहुल दादा बिचकुले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी