कधी वाटतं विसरून जावं
मी कोण आहे.
आणि नव्यानं उभं रहावं
स्वतःला सिद्ध करण्यासाठी
कसा विसरू मी स्वतःला
कारण भूतकाळ तरळतो
रोज डोळ्यासमोर
त्यामुळे वर्तमानकाळ
जड जातोय...
तरी मी विसरण्याचा
खुप प्रयत्न करतोय
आणि नव्यानं उभा राहतोय
एक नवा भविष्यकाळ
निर्माण करण्यासाठी...
अंधाराच्या भूतकाळात
वाट हरवून बसलो
आणि आता शोधतोय
त्या प्रकाशाच्या वाटा
ज्या मला नेतील
एका नव्या क्षितिजाकडे
जिथे मी स्व शोधु शकतो...
चलबिचल झालेल्या मनाला
रोज सावरतोय
कधी कधी तोच विचार करून
बावरतोय...
पण आता सावध पावलं टाकतोय
कुठेही न रुतण्यासाठी
प्रयत्नांना यश मिळो
उमेदीला बळ मिळो
मी नक्की पुन्हा उभा राहील
काहीतरी नवं घडविण्यासाठी....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी