सोमवार, २७ मे, २०२४

झाडं का लावावीत..


जंगल म्हणलं कि आपल्या डोळ्यासमोर लगेच घनदाट झाडांनी भरलेला परिसर दिसेल. पण भविष्यात आपली मुलं नातवंड यांना जंगल चित्रात दाखवावं लागेल कारण जंगल कमी होतंय. याचं मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड...


वृक्षतोड झाली कि जंगल कमी होईल आणि जंगलातील प्राणी त्यांचं घर माणसाने हिरावून घेतल्यामुळे माणसाच्या वस्तीत येतील आणि हल्ले होतील नाही ते आता होतच आहे हे आपण आजूबाजूला ऐकतोय पाहतोय. 


आपण म्हणाल मी एकटा याला काय करू शकतो आणि ते मला शक्य नाही. जे जगाचं होईल ते माझं होईल. बरोबर बोलताय पण या जगात तुमच्यासारखी अनेक माणसं आणि त्यांची कुटुंब मिळून जग तयार झालंय हे आपण विसरतोय.


जगाचा विचार करणं सोडा उद्या भविष्यात उन्हाच्या झळा जगाला सोसो अथवा न सोसो यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढेल अंगाची लाही लाही होईल. पंखा / एसी सुद्धा आग ओकेल हवेतील गारवा निघुन जाईल उष्माघातान माणसं मरतील. कोरोना सारखी परिस्थिती निर्माण होईल जिकडे तिकडे शुकशुकाट...

तेव्हा आपण झाडांचा गारवा शोधण्याचा प्रयत्न करू पण सावली मिळणार नाही. तेव्हा झाडं लावताल पण ती लगेच मोठी होणार नाहीत. तेव्हा आपण आज जी झाडं लावू ती आपल्याला आणि आपल्या परिसराला गारवा देतील. सावली देतील आणि भविष्यातील असह्य उन्हाळ्यात आपण घरी राहून सुद्धा आनंदात असु...


म्हणून म्हणतो मित्रांनो भविष्याची  पावलं ओळखा पावसाळा येतोय झाडं लावा आणि झाडं जगवा.


जगाचं ग्लोबल वार्मिंग समजण्याइतपत आपण तज्ज्ञ नाहीत पण आपल्या परिसरातील वाढतं तापमान, कमी होणारी झाडं, त्यामुळं आपली चिऊ काऊ सारखी पक्षांची कमी होत चाललेली संख्या, पिकांवर वाढत चाललेली किड हे न समजण्याइतके आपण आडाणी नाहीत हे ध्यानात घ्या.

म्हणून जगासाठी नाहीतर आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी प्रत्येकी एकतरी झाडं लावा. आणि त्याला जीवापाड जपा...


*नाथबाबा आपल्याला बहरत चाललेल्या झाडाप्रमाणे अमाप आशीर्वादाचा वर्षाव नक्की करेल.*


*श्री. राहुल दादा बिचकुले*

*नाथदेवराई फाउंडेशन सदस्य*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...