कविता, कथा, लघुकथा, प्रसंगवर्णन, प्रवासवर्णन, चारोळ्या आणि विचार यांचा संमिश्र संगम.....
रविवार, २२ डिसेंबर, २०२४
यवत मलभारे वस्ती आयोजित श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन समारंभ यासाठी भव्य तीन दिवशीय सोहळा...
शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४
डाळिंब येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ज्वारी प्रकल्पाचा शेती दिन साजरा
मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४
यवत व परिसरात दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा
सोमवार, १६ डिसेंबर, २०२४
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न.
शनिवार, १४ डिसेंबर, २०२४
दुर्मिळ होत चाललेल्या लोकसंस्कृतीचा वारसा आजही जपला जातोय.. वासुदेव
उत्पन्नाचे साधन म्हणुन नाही तर आमची परंपरा म्हणुन आम्ही या कलेकडे पाहतोय. : संतोष रायभान कोंडे ( वासुदेव )
पण आता हि लोककला लोप पावत चाललेली आहे. आणि लोककलावंत दुर्मिळ होत आहे. आजपर्यंत वारसा आणि संस्कृती म्हणुन आपण याकडे पाहत आलो आहे. परंतु आता या लोककलेच्या माध्यमातून पोट भरणं अवघड आहे त्यामुळे यामध्ये असणारा वासुदेव समाज नोकरी व्यवसाय करू लागला आणि या लोक कलेपासून अलिप्त होऊ लागला आहे. पूर्वी आपण पाहत असलेले पिंगळा, वासुदेव, ज्योतिषी, हेळवी, साधु संतांच्या पोलिसाच्या वेशातील बहुरूपी, नंदीबैल, कडक लक्ष्मी असे अनेक लोककलावंत आता दुर्मिळ होत चाललेले आहे. कारण या कलेच्या माध्यमातुन आता पोट भरणे अवघड होत चालले आहे.
वासुदेव हि लोकसंस्कृती जपणारे संतोष कोंडे हे आजही आपली हि लोककला जपत आहे. ते म्हणतात उत्पन्नाचे साधन म्हणुन नाही तर आमची परंपरा म्हणुन आम्ही या कलेकडे पाहतोय. कारण आता नाही जपली तर पुढे हा वारसा संपुष्टात येईल. पूर्वी लोकं धार्मिक वृत्तीने आमच्याकडे पाहून दानधर्म करत होते परंतु आता आम्ही दिसताच काही आमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. पूर्वी आम्ही येताच सर्व समाज अवतीभवती गोळा व्हायचा. आता आम्ही आमचा वारसा म्हणुन गावोगावी फिरत असतो रस्त्याने जात असताना कोणी दानधर्म केला तर घेतो नाहीतर आपली संस्कृती परंपरा जपत पुढे जातो. आज आमचे अनेकजण आपला नोकरी व्यवसाय सांभाळत आपला हा वारसा जपत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेली हि लोककला आजही आम्ही अभिमानाने एक वारसा म्हणुन जपत आहे.
आपल्या संस्कृतीची शोभा असणाऱ्या अनेक लोककला या जपल्या गेल्या पाहिजेत आपल्या पूर्वजांनी पाहिलेल्या लोककला आपण कित्येक पहिल्यात आणि आपण पाहिलेल्या लोककला आपली पुढची पिढी किती पाहिल हे आता सांगता येणार नाही. कारण या लोककलेला लोकाश्रय नाही मिळाला तर त्या संपुष्टात येईल आणि आपल्या भारतीय संस्कृतीतील असणारी दानधर्माची परंपराही हि इथेच लोप पावेल. पुढच्या पिढीकडे जाणारी हि धार्मिक परंपरा कमी कमी होत जाईल.गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४
शून्य होतो मी
बुधवार, ११ डिसेंबर, २०२४
गुंतवणूक हा प्रगतीचा राजमार्ग आहे.
गुंतवणूक हा प्रगतीचा राजमार्ग आहे आणि बचत हा गुंतवणूकीचा आधार आहे : राहुल बिचकुले
माणसाने प्रगतीची स्वप्ने पाहिली पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. कारण आपण करत असलेली छोटी मोठी गुंतवणूक हि आपल्याला आपल्या उज्वल भविष्याकडे घेऊन जात असते यामुळे भविष्यात अनेक अडचणीवर आपल्याला मात करून योग्य ती प्रगती साधता येते.आज गुंतवणूकीचे अनेक पर्याय आपल्या समोर आहेत. जसे कि सोने खरेदी, व्यावसायिक गुंतवणूक, जमीन खरेदी, फ्लॅट, वाहन खरेदी, शेतीमध्ये पर्यायी उद्योग, शेअर मार्केट, विमा क्षेत्रातील गुंतवणूक असे एक ना अनेक गुंतवणूकीचे मार्ग उपलब्ध आहेत. यामध्ये आपण गुंतवणूक करून भविष्य समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी गुंतवणूक करणे हि प्रत्येकाची गरज आहे. आणि गुंतवणूक करण्याचं व्यसन प्रत्येकाला असलं पाहिजे. आपली छोटी मोठी गुंतवणूक हि आपल्या कुटुंबाचा आधार असली पाहिजे. म्हणजे आपण ज्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहात ती गुंतवणूक आपल्याला भविष्यात वाढत्या मुल्याने आधार देणारी असली पाहिजे. नाहीतर आपण करत असलेली गुंतवणूक तिचे भविष्यात कमी होत जाणारे मूल्य हे आपल्याला अडचणीत आणू शकते. म्हणुन प्रत्येकाने गुंतवणूक करत असताना फायदा हि गोष्ट डोक्यात ठेऊन गुंतवणूक केली पाहिजे.
आर्थिक नियोजन हे शिक्षण घेऊन समजते असे नाही तर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपण आर्थिक नियोजन कसे करावे हे समजुन सांगु शकतो. उदा. एखादी गृहिणी आपले घर चालवत असताना ती छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये तडजोड करून कुटुंबासाठी लागणारे साहित्य यामध्ये ती गुंतवणूक करत आलेली आहेच आणि त्याबरोबरच या गुंतवणुकीचा आधार असणारी बचत कशी करावी हे तिला चांगले समजते.
मोठे मोठे गुंतवणूकदार यांना गुंतवणूक कशी करावी हे सांगावे लागत नाही. ते त्यांचे आलेले भांडवल आपल्या फायद्याच्या गोष्टीमध्ये गुंतवत असतात त्यामुळे त्यांची गुंतवणूक मोठी आणि होणारा फायदा ही मोठा असतो. परंतु सर्वसामान्य माणुस विचार करतो कि पैसा हा पैश्याकडेच जातो. असे नसते त्यांनी त्या पटीत गुंतवणूक केली त्या पटीत त्यांना आर्थिक फायदा होणार आपण गुंतवणुकीला ज्या प्रमाणे सुरुवात करू त्या प्रमाणे आपल्यालाही फायदा होणार आहे. म्हणुन गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
बचत हा गुंतवणुकीचा आधार आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनात त्याने बचतीला महत्व दिले पाहिजे कारण त्याचे उत्पन्न एकठोक पद्धतीचे नसते थोडे थोडे येणारे पैसे हे त्याने बचत केले पाहिजे व त्याला योग्य ठिकाणी आर्थिक नियोजन करून गुंतविले पाहिजे जेणेकरून त्यामध्ये वाढ होत जाईल व आपली आर्थिक प्रगती साधता येईल.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला बचतीची छोटीसी सवय लावा अगदी लहान मुलांनाही बचतीची सवय लावा आणि त्यामधून ज्याच्यात्याच्या बचती प्रमाणे गुंतवणूक करा. यामुळे प्रत्येकाला आपोआप आर्थिक नियोजन कसे करावे हे समजेल जेणेकरून त्याच्या आयुष्यात त्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. व एका उज्वल भविष्याच्या दिशेने प्रत्येकाची वाटचाल होईल.मंगळवार, १० डिसेंबर, २०२४
दौंड तालुका प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे आरोग्य शिबीर संपन्न
पत्रकारांनी धावपळीच्या युगामध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे मत प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राज्याचे अध्यक्ष सुनील जगताप यांनी व्यक्त केले.
पत्रकारांनी धावपळीच्या युगामध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे मत प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राज्याचे अध्यक्ष सुनील जगताप यांनी व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की पत्रकार हे नेहमी अन्यायाच्या विरोधात लढत समाजाला न्याय व दिशा देत असतात पत्रकारांच्या हितासाठी राज्य सरकारने स्वतंत्र महामंडळ करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना यवत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ किशोर पत्की म्हणाले यवत रुग्णालयात मोफत डायलिसिस केंद्र लवकरच सुरू होणार असून त्याचा रुग्णांनी लाभ घ्यावा. पुणे जिल्ह्यामध्ये महिलांच्या सामान्य व सिझेर प्रसूती मध्ये जिल्ह्यामध्ये क्रमांक दोन रुग्णालय आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी म्हणुन रोज नियमित चालणे व इतर शारीरिक व्यायाम करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना पत्रकार संघाचे दौंड चे अध्यक्ष संदीप सोनवणे म्हणाले की,दौंड तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य करत असल्यामुळे विविध उपक्रम राबविण्यात सहकार्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब काळभोर, जिल्हा सचिव संदीप बोडखे,विजय काळभोर, जनार्दन दांडगे कार्याध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब मुळीक, संदीप नवले , दौंड तालुका उपाध्यक्ष संदीप भालेराव,राहुल अवचट यांच्या सह दौंड तालुका प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
सोमवार, ९ डिसेंबर, २०२४
जंगली श्वापदे मानववस्तीत हि तर धोक्याची घंटा !
महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...
जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...
-
माझ्या गावातलं जागृत देवस्थान श्री सिद्धनाथ जोगेश्वरी देवस्थान श्री सिद्धनाथ मंदिर माणकोबावाडा ( shri siddhnath mandir mankobawada...
-
शिवबा कुणाचा मराठी मनाचा मराठी मन कुणाचे महाराष्ट्रातील मातीचे आठरापगड जातीचे ! महाराष्ट्र असो व इतर राज्य, राज्य सोडा द...
-
धनगरी साज एक वेगळीच बाज रानोवणी घुमतो मेंढ्या हाकण्याचा आवाज भीती नाही कशाची भाळा देवाचा भंडार असा वीर शोभतो तळपती कुऱ्हाडीची धार अंगी साधेप...
-
माझा समाज आणि शिक्षण मनामध्ये येई विचार माझा समाज धनगर शिक्षणाची जरी इच्छा फार परी जिवनाचा प्रवास खडतर आम्ही राखतो मेंढर होऊनी जीवावर उ...
-
वंदन माझे महाराष्ट्राच्या राजाला छत्रपती शिवाजी राजाला वंदन माझे बा मल्हारबाला त्यांच्या थोर कर्तुत्वाला वंदन माझे पुण्यश्लोक मातेल...




