दौंड : महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने रब्बी हंगामाअंतर्गत मौजे डाळिंब येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ज्वारी प्रकल्पाचा शेती दिन शेतकरी प्रकाश विठ्ठल गायकवाड यांच्या शेतामध्ये आयोजित करण्यात आला होता. या ज्वारी प्रकल्पामध्ये डाळिंब गावाची निवड करून शेतकऱ्यांना पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करून निविष्ठांचे वाटप करण्यात आले होते. तालुका कृषी अधिकारी राहुल माने, मंडळ कृषी अधिकारी स्वप्नील बनकर व कृषी पर्यवेक्षक मनोज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना पेरणीपासून ते काढणीपर्यंत पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याविषयी कृषी सहाय्यक विनायक जगताप यांच्या नियोजनाखाली पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी पोपट बबन म्हस्के यांनी सांगितले की कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे आमचे ज्वारीचे पीक खुप चांगले असुन नेहमीच्या पद्धतीपेक्षा आम्हाला 30 ते 40 टक्के उत्पादनामध्ये वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला. यावेळी कृषी सहाय्यक विनायक जगताप, पंढरीनाथ कुतवळ, कृषी लोकसेवा शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा गायकवाड, पोपट म्हस्के, महादेव म्हस्के, लहूनाथ म्हस्के, दत्तात्रेय म्हस्के , गणेश गायकवाड, शंकर काळे, लक्ष्मण शितोळे, सुखदेव गायकवाड, सतीश म्हस्के, रिसोर्स फार्मर युवराज जगताप यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी विभागाने राबवलेल्या प्रकल्पाबद्दल कृषी विभागाचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
कविता, कथा, लघुकथा, प्रसंगवर्णन, प्रवासवर्णन, चारोळ्या आणि विचार यांचा संमिश्र संगम.....
शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४
डाळिंब येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ज्वारी प्रकल्पाचा शेती दिन साजरा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...
जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...
-
माझ्या गावातलं जागृत देवस्थान श्री सिद्धनाथ जोगेश्वरी देवस्थान श्री सिद्धनाथ मंदिर माणकोबावाडा ( shri siddhnath mandir mankobawada...
-
शिवबा कुणाचा मराठी मनाचा मराठी मन कुणाचे महाराष्ट्रातील मातीचे आठरापगड जातीचे ! महाराष्ट्र असो व इतर राज्य, राज्य सोडा द...
-
धनगरी साज एक वेगळीच बाज रानोवणी घुमतो मेंढ्या हाकण्याचा आवाज भीती नाही कशाची भाळा देवाचा भंडार असा वीर शोभतो तळपती कुऱ्हाडीची धार अंगी साधेप...
-
माझा समाज आणि शिक्षण मनामध्ये येई विचार माझा समाज धनगर शिक्षणाची जरी इच्छा फार परी जिवनाचा प्रवास खडतर आम्ही राखतो मेंढर होऊनी जीवावर उ...
-
वंदन माझे महाराष्ट्राच्या राजाला छत्रपती शिवाजी राजाला वंदन माझे बा मल्हारबाला त्यांच्या थोर कर्तुत्वाला वंदन माझे पुण्यश्लोक मातेल...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी