गुरुवार, ३ जानेवारी, २०१९


पाळणा गीत
पहिल्या दिवशी जन्मला बाळ
शंकर देवांन घेतला अवतार
थरथरू लागले दैत्य असुर
जो बाळा जोजोरे जोजो || १ ||

दुसऱ्या दिवशी सांगती वेळ
बाळ ठरेल दैत्याचा काळ
आनंद झाला तिन्हीया ताळ || जो ||

तिसऱ्या दिवशी तिसरा रंग
सारे देवगण झालेत दंग
बाळावरी उधळी गुलाबी रंग || जो ||

चौथ्या दिवशी वाजती ढोल
बाळ झाला हो काशी क्षेत्रपाल
दैत्याच त्यांन केल हो हाल  || जो ||

पाचव्या दिवशी पाचवीचा राडा
दारी मांडव टाकीला सडा
पाना फुलांची रांगोळी काढा || जो ||


सहाव्या दिवशी आल्या सुंदरी
घेऊनी हाती पाळण्याची दोरी
पाळणा हालवी नारी सुंदरी || जो ||

सातव्या दिवशी सातवा ताल
बाळाच्या हाती तलवार ढाल
बाळ शिकला युद्धाची चाल || जो ||

आठव्या दिवशी आठवा राडा
साऱ्या नारींनी घातला गराडा
लिंब लोणानी दृष्ट हो काढा || जो ||

नवव्या दिवशी नववा सोहळा
बाळाच्या गळ्यात नवरत्न माळां
पारणे फेडीती दोन्हीया डोळा || जो ||

दहाव्या दिवशी केला गजर
बाळाला दिली ढालतलवार
बाळ मारितो दैत्य असुर || जो ||

आकराव्या दिवशी जमली सारी
घोडा बांधिला बाळाच्या दारी
बाळ शिकला घोडे हो स्वारी || जो ||
बाराव्या दिवशी बारश्याचा थाट
बसाया ब्राम्हणांना चौरंग पाट
नाव सिद्धनाथ कुरकवा नीट || जो ||

तेराव्या दिवशी गजर झाला
थाप मारून अशी ढोलाला
देव सिद्धनाथ नाचु लागला || जो ||

चौदाव्या दिवशी केला बोलबाला
गजेनृत्यात आहे युद्ध हो कला
भक्त गणाला शिकवु लागला || जो ||

पंधराव्या दिवशी वाटतो हेवा
माणकोबा भक्त करितो सेवा
यावे तुम्हीही माझीया गावा || जो ||

सोळाव्या दिवशी सोळावा थाट
होऊन रात्र झाली पहाट
माणकोबाच्या देव स्वप्नात आला || जो ||

सतराव्या दिवशी केला जागर
सेवेत गुंतला माणकु धनगर
पूजा करीती बिचकुले परिवार || जो ||
अठराव्या दिवशी सोहळा केला
पांजकरी भक्त गोळा हो झाला
कुसमा भांगचा निवद केला || जो ||

एकोणिसाव्या दिवशी झाला बोलबाला
माणकोबा वाडीचा उद्धार केला
सिदोबा माणकोबा नामी पावला || जो ||

विसाव्या दिवशी आनंद झाला
भक्ताला त्यान आशिर्वाद दिला
भक्त बोलती चांग हो भला || जो ||

एकविसाव्या दिवशी उधळून गुलाल
श्रद्धेने अर्पितो नारळ फुल    
पाळणा रचितो बिचकुले राहुल   || जो || 

भक्तीने गातोया पाळण्याची चाल 
गीत गातोया शेंडगे राहुल 
साद देती यवत शाळेची मुल   || जो || 

भक्तीने गातोया धरुनी ताल
बाजीराव गातो पाळण्याची चाल
भक्त सारे उधळी गुलाल || जो ||

https://youtu.be/VR1TcLb8ZOE  

      कवी : राहुल दादा बिचकुले
गायक : शेंडगे राहुल ( संगीत शिक्षक )
गायक : बाजीराव होले 
  


1 टिप्पणी:

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...