मार्ग अंधश्रद्धेचा
मंदिर, प्रार्थनास्थळ हि माणसाच्या श्रद्धेची ठिकाणे आणि भारतीय संस्कृतीची वारसा स्थळे हि ठिकाणे आज विकासाच प्रतीक ठरत आहेत आणि समाजप्रबोधनाच एक प्रभावी व्यासपीठ ठरत आहेत. येथे देवावरील विश्वासापोटी अनेक श्रद्धाळू भाविक देवाच्या दर्शनासाठी येथे एकत्र येतात परंतु अनेक अंधश्रद्धाळू बुवा बाबा जे अंधश्रद्धेच्या बाजारातील एक्सपर्ट व्यापारी भक्ताच्या श्रद्धेच्या फायदा घेऊन त्यांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात सहज ओढतात.....
बोलणं तर किती गॉड ...... ये अजाण बालका तुला जाण नाही तुझ्या आयुष्यात काय चाललंय तू चांगल्या वाटेनं जाण्याचा प्रयत्न करतो आहे पण वाटेतील काटे काही दूर होत नाही.....
माणसाला पूर्ण घोळून घेतात मग पुढचं शस्त्र.....
तुझे शेजारी त्यांना तुझं पाहवत नाही काही काळापूर्वी सगळं काही चांगलं चाललं होतं पण आता त्या एका वाईट करणीमुळे तुझा संसार भरकटत चालला आहे... आणि पुढे अनेक संकट येणार आहेत.....
संकटाच नाव काढलं तर लगेच श्रद्धाळू मनातुन घाबरतो आणि उपाय विचारतो....
महाराज उपाय काय यावर ......
मग येतो उपाय
हा घे गंडादोरा तुझ्या डाव्या दंडाला बांध..... आन हि बाहुली दरवाजावर बांध ... तात्पुरती संकट रोखली जातील.....
पुढचा उपाय जालीम करावा लागलं
अमुक तमुक वारी भेट देवाला सुक्या निवदाच ताट
दंड म्हणुन दक्षिणा आन या बाबाला अंगी वस्त्र उपरणा घेऊन ये बाबा सारी संकट होतील दूर नाही पडणार घरावर वाईट नजर समोरच्याला करून टाकीन बेजार लोटांगण घालील तुझ्या पायावर......
मग श्रद्धाळू भाविक मनातुन समाधानी होतो बाबाला दक्षिणा देतो घरी येतो सांगितलं ते सारं करतो आणि समाधानी माणुस मनातुन सूडान पेटतो.... ह्या शेजाऱ्यावर संशय त्या शेजाऱ्यावर संशय त्यातून नसतं वैर पत्करतो... एकाकी जीवन जगु लागतो.... आता आधार फक्त बुवा बाबांचा...... अशाप्रकारे अंधश्रद्धेच्या जाळ्यात पुरता गुरफटून जातो........
लेखक : राहुल बिचकुले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी