काय बोलु सखे तुला
काय बोलु सखे तुला
काही समजेना ग मला
हृदयी धकधक होते पाहता तुला
तुला मी पाहिलं
तुझ्याशी मी बोललो
तेव्हापासून काय झालं मला
विसरलो मीच ग स्वताला
तुला पहिल्यापासून
नजर माझी स्थिर झाली
काय सांगू सखे तुला
भुलली नजर तुझ्या ग सौंदर्याला
आधी कसं
सगळ काही ठीक होत
आता हृद्य धडधडत
झोप येत नाही ग मला
काय म्हणे प्रेम झालं
प्रेम झालं म्हणे मला
पण हृदयी धीर कुठे माझ्या
हे सार सांगीन मी तुला
एक दिवस आला
बोलण्याचा निश्चय मी केला
तुझ्याशी काय बोलावं
या विचारात आठवडा ग गेला
तुला भेटण्यासाठी सखे
एक कागद मी लिहला
त्या कागदावरी उतरविला
भाव माझ्या मनातला
मनी धीर करून
कागद तुझ्या हाती दिला
कागद पाहता तु
होकार मला दिला
काय आनंद झाला मला
हृदयी झुले प्रेमाचा झुला
काय सांगु सखे तुला
तु मिळाली मला
© कवी : राहुल दादा बिचकुले
खूप सुंदर.. काळाला भिडली..👌👌
उत्तर द्याहटवातुमचा प्रतिसाद हाच आमचा आशीर्वाद .... धन्यवाद
हटवा