रविवार, २४ एप्रिल, २०२२

कवी लेखकांच्या लेखणीचा आपण करावा सन्मान

मजजवळी नाही काही
आहे शब्दांचेच धन
कोणती मोठी कला नाही
जमते शब्दांची गुंफण

बळ देते लेखणीला
कौतुकाचे शब्द दोन
जरी असली फाटकी झोळी
मज वाटे मी मोठा धनवान

नको नको मज काही 
तरी मागतो एक मागणं
कवी लेखकांच्या लेखणीचा
आपण करावा सन्मान

कवी लेखकांच्या ठायी
शब्द रत्न अलंकारासमान
जोडुनी शब्दांशी शब्द
मिळवितो मोठा बहुमान

कवी : राहुल दादा बिचकुले
माणकोबावाडी यवत, ता. दौंड, जि. पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...