रविवार, १७ एप्रिल, २०२२

नको जगण्याचा तिरस्कार करू

नको जगण्याचा
तिरस्कार करू
माणसा अर्धवट सोडुन जगणं
नको असा रे तु मरू

जीवन देवाजीची देणं
सजीव आहे पुण्यवान
जन्म जरी तुझा झाला
येईल एक दिवस मरण

मरण निश्चितच आहे
कधी येईल सांगता येत नाही
कंटाळू नकोस जगण्याला
मरणासाठी करू नको काहीबाही

ज्याने जन्म दिला
तोच नेईल तुला
कर्तव्य गाजव या पृथ्वीवर
नाही पुन्हा तु या जन्माला

जगण्याची हि लढाई
लढावीच लागेल तुला
मन नको कमकुवत
जे त्यागील जीवाला

जगण्याचे मार्ग अनेक
नको शोधु या पळवाटा
ठाम रहा या रणांगणी
पर्याय शोध जगण्याला

आत्महत्या आत्मघात
हे शोभत नाही तुला
सतत सावरत रहा मनाला
जिंकून दाखव या जगण्याच्या लढाईला
जिंकुन दाखव या जगण्याच्या लढाईला

कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...