नको मांडु शब्द
गुंफूनी एकमेकात
दुःख असे मांडतो
जणु आहेस सुखात
कल्पना कल्पना असते
त्याला भावनेचा आधार
सर्वकाही सत्यच मांडतो
पण हा कवीचा विचार
शब्द विश्वात रमतो
सदा आनंदी दिसतो
हळवं हे मन
दुःखी चेहराही वाचतो
ओठावर दिसतं समाधान
डोळं वेगळंच सांगतं
दुःखी असतं हे मन
हुंदका आतच दाबतं
विचार भावनेचा संगम
तिथे नाविन्याचा उगम
कविता जरी शब्दांची गुंफण
तेच खरे कवीचे चिंतन...
कवी : राहुल दादा बिचकुले
माणकोबावाडा, यवत, ता. दौंड, जि. पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी