हि वाट कुठं जाते
जिवन एक प्रवास आहे
इथं फक्त चालायचं असतं
जाता येता ईचारपुस करीत
नवं नातं फुलवायचं असतं
चांगलं वाईट समजून घेत
पुढं पुढं चालायचं असतं
एक मात्र लक्षात ठेवायचं
हि वाट कुठं जाते
हे मात्र ईचारायचं असतं
नवख्या वाटेने जाताना
कधी डगमगायचं नसतं
मनाला विचारून
पुढं पुढं चालायचं असतं
अनुभावाची शिदोरी घेत
प्रवासात आनंदी राहायचं असतं
ध्येय मनाशी ठेवून
हि वाट कुठं नेईल
हे मात्र लक्षात ठेवायचं असतं
हि वाट कुठं जाते
हे जो समजुन घेतो
एकदा वाट सापडली कि
तो आयुष्यात यशस्वी होतो
प्रवास करत रहा
वाटा समजुन येतील
ध्येय मनाशी ठेवा
हि वाट कुठं जाते
हेही समजुन जाईल
कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी