सख्या कधी भेटशील, मना लागली हुरहूर
तुझ्या भेटीच्या ओढीनं, करी हृदय जागर ||धृ||
बहु दिसाची भेट आपुली
आजही ती मनात जपली
क्षणभरी पडेना मनाला विसर
तुझ्या भेटीच्या ओढीनं, करी हृदय जागर ||1||
तुम्हीच माझे आहे राजसा
सपान रंगतया भर दिवसा
दिस सरेना त्यात रातीचा भार
तुझ्या भेटीच्या ओढीनं, करी हृदय जागर ||3||
यावं तुम्ही इथे आज दिलबरा
न्यावे मज आता आपुल्या घरा
करू जोडीनं सुखाचा संसार
तुझ्या भेटीच्या ओढीनं, करी हृदय जागर ||4||
पिंजऱ्यात बोलतो तो रावा
येईल साजन उरकुन ठेवा
आटोपले माझं गाठू आता घर
तुझ्या भेटीच्या ओढीनं, करी हृदय जागर ||5||
कवी, राहुल दादा बिचकुले
यवत, दौंड, पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी