मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२

एक मोरपंखी साडी घ्याहो मला मिळवायला

नको लाडी गोडी सख्या न्याहो मला फिरवायला
एक मोरपंखी साडी घ्याहो मला मिरवायला || धृ ||

साडी घेताना रंग पहा जरा
त्यावर असुद्या एक मोर पिसारा
मग मनातला मोर लागेल नाचायला
एक मोरपंखी साडी घ्याहो मला मिरवायला || 1 ||

साडी सुंदर लागेल नजर
मैत्रिणीही पाहतील भिरभिर
चेहऱ्यावरचे भाव मला येतील वाचायला
एक मोरपंखी साडी घ्याहो मला मिरवायला || 2 ||

साडीवरती अलंकार
शोभुन दिसतील ते सुंदर
अलंकार कसे लागतील ते चमकायला
एक मोरपंखी साडी घ्याहो मला मिरवायला || 3 ||

राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...