मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२

खाऊ एकच मिसळ आवडीनं

लई गोडीनं जाऊ जोडीनं 
खाऊ एकच मिसळ आवडीनं

सुंदर साजेसं ताट आलं
चमचम करतंय पावावर तेल
कसं आता दिसतंय ताट ते छान 
खाऊ एकच मिसळ आवडीनं

कोल्हापूरची झणझणीत
पुणेरी ती भरली मनात
शेव चविष्ट लागते छान
खाऊ एकच मिसळ आवडीनं

मिसळप्रेमी आम्ही तुम्ही
चव नाही ती कुठे कमी
चव घ्या थोडी तुम्ही समजुन
खाऊ एकच मिसळ आवडीनं

कवी- राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...