मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२

वेळेला चहा हवा

वेळेला चहा हवा चहासाठी वेळ हवी
नको कोणती नशा एकतरी तलफ हवी

कुणी पितो साखरेचा
कुणा आवडतो गुळाचा
ज्याची त्याची आवड नवीनवी
नको कोणती नशा एकतरी तलफ हवी

चहाविना नाही पाहुणचार
नाही ठरत कुठला व्यवहार
कपासोबती बशी ती घ्यावी
नको कोणती नशा एकतरी तलफ हवी

चहा झटकीतो मरगळ
चहा घेतो देतो वेळ
चहासोबती बिस्किटं खावी
नको कोणती नशा एकतरी तलफ हवी

कवी : राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...