मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२

कोजागिरी पुनवेला राया दुध हे उकळायचं

अंगणात पसरलं तेज, तेज ते चंद्राचं 
कोजागिरी पुनवेला राया दूध हे उकळायचं

बदाम पिस्ता केशर घालुनी
साखरेची त्याला गोडी देऊनी 
आता चंद्राला बोलवायचं 
राया आता दुध हे उकळायचं

कोजागिरी पुनवेला राया दुध हे उकळायचं

काळोख सरूनी प्रकाश झाला
चांदणी आहे चंद्राच्या जोडीला
राया आता अज्ञान दुर सारायचं
आनंदाने आता पुढे चालायचं

कोजागिरी पुनवेला राया दुध हे उकळायचं

 संसार आपण जोडीने थाटला
वंदन करु दुर्गा मातेला
करुनी व्रत कोजागिरीचं
देव्हारी आईला पुजायचं

कोजागिरी पुनवेला राया दुध हे उकळायचं

कवी. राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...