शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा #नाथदेवराई फाउंडेशन

 

हि दिवाळी आपल्या विचारात परिवर्तन घेऊन आली. निसर्गाची गरज जगाला दाखवून दिली...
आता आपणही निसर्गाला शोभेल अशी दिवाळी साजरी करू, पर्यावरणाचे रक्षण करू आणि या वसुंधरा मातेला हिरवाईने नटवून देदीप्यमान करू...

चला करू मनी संकल्प
होऊ आपण हरितसेवक
करू निसर्गाचे संवर्धन
करू सर्वत्र वृक्षारोपण
मिळेल सर्वत्र ऑक्सिजन
प्रसन्न राहील वातावरण
लावु या विचारांचा दिप
कार्य करू असे काही
लक्ष्मी माता वरदान देईल अमाप....

सर्व वृक्षप्रेमी पर्यावरण स्नेही मित्रपरिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....

#नाथदेवराई_फाउंडेशन
#आपली_नाथदेवराई


शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०

दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा

 


 

आली आली दिवाळी 
सण दिव्यांचा आला जवळी 
आज दिस उगवला पहिला 
ओवाळू सारे माता गाईला 
अंगणात रांगोळी सजली 
घरं दिव्यांनी लखलखली
आला लक्ष्मी कुबेर पुजनाचा सण 
येईल लक्ष्मी घेऊन धन 
येईल आता भाऊबीज सण 
सांगुन जातो भावाबहीणीचं नातं महान
असा दिवाळीचा सण 
आनंदीत झाले मन 
तुम्हाला व तुमच्या परिवारातील सर्वांना 
शुभेच्छा मनापासून 🎉🎀🎁🎁🎁🎁🎁🎁❤❤❤❤❤🍥💐💐💐💐💐
Happy Diwali 🎉🎉🎉🎉🎉🎉 from : Rahul Bichkule family🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐💐💐 ( लेखक : राहुल बिचकुले )

मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०

चाहूल दिवाळीची

 



चाहूल नवी लागली

आली दिवाळी आली

सजले घर अंगण

सृष्टीही सजली सारी


सृष्टीची हि किमया न्यारी

आसमंती केली दिव्याची तयारी

सूर्यनारायण सज्ज झाले

दिप बनुनी गगनी प्रकटले


सण आनंदाचा

सण तेजाचा

उत्साह वाढवी मनाचा

बहर येतो नवचैतन्याचा


गार गार थंडी

अंगणी येती प्रकाश झुंडी

प्रत्येकाच्या शब्द तोंडी

आली दिवाळी आली


आली दिवाळी आली

सुरुवात आनंदाला झाली

घरोघरी नवकिरणांची झळाळी

अशी आनंदाची दिवाळी


सण दिवाळीचा

आनंदाने साजरा करू

लावुनी आनंद, विचार दिप

सर्वत्र आनंद, विचार पसरू


जपुया स्वतःला, घरकुटुंबाला

जपु आपण निसर्गाला

उधाण येईल आनंदाला 

दिवाळीच्या

शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला



शुभेच्छूक -

कवी. राहुल दादा बिचकुले आणि मित्रपरिवार


रविवार, १ नोव्हेंबर, २०२०

नवपालवी - आपली नाथदेवराई

 

पिंपळ पालवी


ध्येयाची या केली पेरणी

फुटली त्यास नवपालवी

श्रम हे नवयुवकांचे

घामाचे झाले मोल

पक्षीही गातील बोल

बहरेल हिरवी वनराई

आशिर्वाद देईल धरणीमाई

आपली नाथदेवराई


*आपली_नाथदेवराई*

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा





 सोनं घ्या सोन्यासारख रहा

निसर्गाचा आदर करा

प्रेमाने निसर्ग देईल ते घ्या

निसर्गाला ओरबाडू नका

आज आहे दसरा

जुने विचार थोडे विसरा

झाडे लावा झाडे जपा

झाड तोडू नका

पुजेला एका पानाची गरज

त्यासाठी झाडाचे जीवन खोडू नका

हि सृष्टी आहे महान

कार्य करूया पुण्यवान

करू सणाला वृक्षांचे दान

राखू निसर्गाची आपण शान

मनाला मिळेल समाधान

मिळेल नवा आत्मसन्मान

सोबती राहुद्या या नव्या

विचारांची देणं

सार्थकी लागेल जीवन

निसर्ग जे देईल ते आनंदाने घ्या

स्वार्थ नको मनात

निसर्गासाठी सुद्धा काहीतरी द्या

आज आनंदाचा सण

सोनं घ्या सोनं द्या

वादविवाद सारे विसरा

विचारांचे बीज पसरा

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला

हॅप्पी दसरा....


दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..


*आपली नाथदेवराई*


गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून नाथदेवराई फाउंडेशन ने साजरा केला वृक्षदान व वृक्षारोपण सोहळा.

  'करून वृक्षरोपण फुलवु वनराई, हिरवीगार दिसेल धरणीमाई, जीव लावुनी कार्य करते आपली नाथदेवराई' हे ब्रीद घेऊन नाथदेवराई फाउंडेशनचे सदस्य वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्य करत आहेत.


माणकोबा वाडा येथे आयोजित केलेला वृक्षदान व वृक्षारोपण सोहळा : नाथदेवराई फाउंडेशन 


 दौंड तालुक्यातील माणकोबावाडा येथे सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे औचित्य साधुन दि. २२ रोजी  नाथदेवराई फाउंडेशन ने वृक्षारोपण व वृक्षदान कार्यक्रम आयोजित केला होता. 'करून वृक्षरोपण फुलवु वनराई, हिरवीगार दिसेल धरणीमाई, जीव लावुनी कार्य करते आपली नाथदेवराई' हे ब्रीद घेऊन नाथदेवराई फाउंडेशनचे सदस्य वृक्षारोपण व झाडांचे संगोपन करण्याचे काम करत आहेत.  

    सकाळी ९ वाजता देवीची आरती करून नाथदेवराई फाउंडेशन, जोगेश्वरी ग्रुप, सिद्धनाथ तरूण मंडळ, माणकोबा तालीम संघ, व माणकोबावाडा ग्रामस्थ एकत्र येऊन झाडांची पुजा करून झाडांचे वाटप करण्यात आले . त्यानंतर माणकोबावाडा रस्त्याला देशी वृक्षांचे वृक्षरोपण करण्यात आले.

    नाथदेवराई फाउंडेशनचे सदस्य पोपट शिवाजी लकडे यांनी आपल्या मुलीच्या जन्माचा आनंद म्हणुन ५० चिंचेच्या वृक्षांचे वाटप केले. व सर्वांना माझी मुलगी माझा अभिमान हा संदेश दिला. 

   या कार्यक्रमासाठी मारुती बाळु बिचकुले, धुळा सटु भिसे, दादा हिरामण बिचकुले, राजु बबन बिचकुले, दादा ठकू भिसे, लहू लक्ष्मण लकडे, भिमाजी बापु लकडे, मल्हारी नाथु बिचकुले, पप्पु बाळू लकडे, भाऊसो भिमाजी खताळ, प्रकाश बापु भिसे, कैलास भिमाजी पिंगळे व बापु बबन लकडे आदी कार्यकर्त्यांनी वृक्षभेट व इतर सहकार्ये केले.

  त्याचबरोबर या कार्यक्रमाला नाथदेवराई फाउंडेशन सदस्य, माणकोबा वाडा ग्रामस्थ व प्रमुख पाहुणे म्हणुन श्रीकांतजी हंडाळ ( दौंड भटकंती) हे उपस्थित होते.

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

बैल पोळा कविता

 


वर्षाकाठी हो सण एकदा

बैल पोळा आला

आला आला आला बैलपोळा आला

आता सजवू नंदीला, सजवू बैलाला


आयुष्य भर त्याने दिली हो साथ

सोनं पिकवलं आपल्या शेतात

त्याचे ते ऋण उतराई म्हणून

आज या सणाला करूया पुजन


दुःख भरल्या जिवनात 

ओढूनी नांगर

हलका केला माझ्या 

डोईवरचा भार

दुःख दूर केलं

दिलं सुखाचं हो दान

आज या सणाला करूया पूजन


चढविली अंगावरी मोतीयाची झुली

सुंदर रंगानं बैलं सजविली

भाळी बाशिंग शोभतया छान

आज या सणाला करूया पूजन


शेतकरी दादा करी उपवास 

प्रेमानं भरवी पुरणपोळीचा तो घास

गळ्यात बांधल्या अलंकार माळा

शिंगात शिंगोळ्या शोभती छान

आज या सणाला करूया पूजन


शेतकरी बैलं यांचं वेगळंच नातं

दुःख होऊद्या कोणाला

पाणी दोघांच्या डोळ्यात

जगामधी बळीराजाला वेगळाच मान

आज या सणाला करूया पुजन



कवी/शेतकरी मित्र : राहुल दादा बिचकूले

बैलपोळा

 



 तुझा सण आज सर्जा राजा
आज पोळ्याला करितो पूजा

ऋण अपार तुझं र
शेत माझं पिकलं 
तुझ्या सोबतीनं माझं
दिस दुःखाच सरलं

माझ्या दुःखाच्या दिसात
आसवं होतं तुझ्या डोळ्यात
नाही मिळालं पोटभर
तरी ओढला नांगर

तुझ्या कष्टानं पिकलं शिवार
माझ्या डोईवरचा तु उतरविला भार
चीज झालं तुझ्या कष्टाचं 
दिस आज आलया सोन्याचं

ये सर्जा ये राजा
आज पोळ्याला करितो तुमची पूजा
नाही आता दुःख कशाचं
दिस आलया सोन्याचं

तुम्हा आता सजविल
अंगा टाकुनी झुल 
शिंगे करुनी चमकदार
रंग भरील अंगावर

तुम्ही दावणीची शोभा माझ्या
माझा लाडका सर्जा राजा
गॉड घास भरवील
दृष्ट तुमची काढील

ऋण तुमचं अपार
माझ्या डोईवर भार 
सेवा केली आजवर
आज तुमची सेवा मी करणार

या पोळ्याच्या सणाला
मी पूजितो रे तुम्हाला
तुमची साथ संसाराला
कमी नाही मग कशाला

कवी. राहुल दादा बिचकूले
शेतकरी मित्र
कमी नाही कशाला



मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

शुभ दिवस ( कविता )

 


शुभ दिवस शुभ रात्री 

आहे तरी काय

रोज रोज येती संदेश

समजतच नाय


सकाळ दुपार संध्याकाळी

मोबाईल वाजतो प्रत्येक वेळी

असतो त्यावर एकच संदेश

शुभ रात्री आणि शुभ दिवस


माणुस गुंतला कामात रोज 

नसतो वेळ उदया ना आज

मित्र पाठवती एक संदेश 

सुंदर आहे आजचा दिवस


सुंदर आहे आजचा दिवस

विचार बदलवतो हाच संदेश 

चैतन्य निर्माण होते मनात

आनंद निर्माण होतो कामात


प्रत्येक दिवस सुंदर आहे

प्रत्येक दिवस नवीन आहे

नवीन दिवसाची नवी सुरुवात

आनंदाची होते बरसात


शुभ दिवस सुंदर दिवस

हाच संदेश आठवा मनी

आंनद मिळेल क्षणोक्षणी


शुभ दिवस सुंदर दिवस

सुंदर दिवसाच्या सुंदर आठवणी




      कवी : राहुल बिचकुले


🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

बाहेर फिरतोय कोरोना सुर ( कविता )

फोटो स्रोत - इंटरनेट ( प्रतिकात्मक चित्र )


जग थांबलय आता हो सारं 
तुम्ही करा थोडा विचार
बाहेर फिरतोय कोरोनासूर
जपा आपलं आपणच घरदार

मास्क लावूया तोंडाला
हाताला लावू सॅनिटायझर
सुरक्षित राखुनी अंतर
ठेवू कोरोनाला आपण दूर

बाहेर फिरतोय कोरोनासूर
जपा आपलं आपणच घरदार

विनाकारण फिरणं टाळा
बसेल कोरोनाला हो आळा
थोडा करावा सर्वांनी विचार
कोरोना ला ठेवूया दुर

बाहेर फिरतोय कोरोनासूर
जपा आपलं आपणच घरदार

करू गरम पाण्याचा वापर
घेऊ संतुलित आहार
नको आता हो जागर
आराम आहे आधार

बाहेर फिरतोय कोरोनासूर
जपा आपलं आपणच घरदार

दिसता लक्षण करू उपाय
नको कोणाला व्हावा अपाय
थोडं राहुनी आपण दूर
वाचवू शकतो घर परिवार

बाहेर फिरतोय कोरोनासूर
जपा आपलं आपणच घरदार

दिवसागणिक संख्या वाढतेय
आपल्याला हेच सांगतेय
नियम पाळावे लागतील सारं
हाच जगण्याचा आधार

बाहेर फिरतोय कोरोनासूर
जपा आपलं आपणच घरदार


 कवी. राहुल दादा बिचकुले.

सावलीचा आधार (कविता) हरितवारी फाउंडेशन, नाथ देवराई फाउंडेशन तसेच सर्व वृक्ष प्रेमींना हि कविता सहृदयी समर्पित ...

उघडं बोडकं उजाड रान
डोईवर तापतंय ऊन
वारा सुटेना काही गार
कुठे भेटेना सावलीचा आधार

कसा बदलला हा काळ
एकेकाळी होता सुकाळ
आज पडला का दुष्काळ
माणसाच्या कर्माची ही फळं

बांद बांधुरे राहीले ना नीट
झाड दिसेना दुरवर कुठं
होती झाडे थोडीफार
पण माणुस स्वार्थी फार

चार पैशासाठी तोडली झाडं
ना ठेवली बुंधा ना खोड
आता झाडं लावण्या नाही सवड
पण निसर्गाच्या ताकदीला नाही तोड

नाही पडणार पाऊस इथं
झाडं नसतील जिथं जिथं
पक्षी होतील हद्दपार
किडं खातील शेत शिवार

जातील निघुन मधमाश्या
फळ पिकांची होईल दुर्दशा
नका ठेऊ तुम्ही आशा
विकासाची सोडा आता भाषा

विकास संपेल
निसर्ग कोपेल
मग येतील मरण कळा
संपेन निसर्गाचा जिव्हाळा

म्हणुन सांगतो ऐका
निसर्गाला तुम्हींहो जपा
ताकद मोठी निसर्गाची 
परीक्षा नको निसर्गाची

तुम्ही लावा भरपुर झाडं
नाही दिसणार उघडं बोडकं शिवार
धरणी दिसेल हिरवीगार
पक्षी येतील इथेहो फार

नाही कीड पडणार पिकावर
पिके येतील जोमदार
मधमाश्या गोंगावतील
बहरतील फळं नी फुल

हि आहे निसर्गाची कमाल
हे आहे झाडांचे मोल
समजून घ्यावं आता थोडं
प्रत्येकांनी लावावी झाडं

नाही लागणार आता ऊन
हिरवीगार दिसतील रान
गोंगावेल वारा गारगार
नाही लागणार शोधावा सावलीचा आधार
नाही लागणार शोधावा सावलीचा आधार

वृक्षमित्र कवी : राहुल दादा बिचकुले 
हरितवारी फाउंडेशन 
नाथ देवराई फाउंडेशन माणकोबा वाडा 
तसेच सर्व वृक्ष प्रेमींना हि कविता सहृदयी समर्पित ...

झाडे लावा झाडे जगवा, धरणी माईला हिरवा शालू नेसवा....




रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

रानातली लोक दैवत

भुलेश्वर डोंगरातील दैवत 

उघड्या बोडक्या माळरानी
शेताच्या बांदावरी
रात असो वा दिस
देव म्हसोबा राखण करी

ओढे नाले असो दाट वनराई
तिथे राहते माता मावलाई
काय सांगु आईची नवलाई
लेकीबाळींची तीच आई

दाट वनात आड रानात 
गावाच्या शिवेवरी
बसून आई सटवाई 
लहान थोरांची राखण करी

अशीच रानावनात
प्रत्येकाच्या मनामनात
रानातली हि दैवतं
देती मनाला ताकद अशी हि लोक दैवतं
अशी हि लोक दैवतं

कवी: राहुल दादा बिचकूले

 

धनगरी जीवन



धनगरी साज एक वेगळीच बाज
रानोवणी घुमतो मेंढ्या हाकण्याचा आवाज
भीती नाही कशाची भाळा देवाचा भंडार
असा वीर शोभतो तळपती कुऱ्हाडीची धार
अंगी साधेपणा पण वृत्ती त्याची रांगडी
शोभा देते खांद्याला लोकरीची घोंगडी
डोईवर मुंडासे पटका दिसतोय छान
हिच आहे धनगरांच्या मानाची निशाण
अंगी शोभे बाराबंदी तीन गुंड्याचीर बंडी
असा देखणा रुबाब भारदार दिसतोय गडी
हातामधी कडं पायामधी तोडा
बसायला त्याला असतो देखणा रं घोडा
पूजतो धनगर वीर दैवताला
डोंगराचे देव खंडोबा, बिरोबा, सतोषाला
पांगरायला कांबळ उबदार जान
धनगरांची लक्ष्मी मेंढरं हेच समृद्ध जीवन
असं खडतर जीवन रोजचंच ते चालणं
तुडवीत डोंगर दऱ्या काट्या कुट्यातून
कधी देत नाही कर्माला दुशान
आनंदाने जगतो वाट्याला आलेलं जीवन
आहे त्याला धनगर असल्याचा अभिमान
आहे त्याला धनगर असल्याचा अभिमान

कवी राहुल दादा बिचकूले
यवत, माणकोबा वाडा

 

सोमवार, १ जून, २०२०

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती - नाथ देवराई फाउंडेशन


थोर विचारांची करू देवाणघेवाण
जयंती म्हणजे आनंदाचा सण
निसर्गाचे आपल्यावर ऋण
त्यात उतराई म्हणुन
करू वृक्ष संवर्धन
हाच वसा शिरसावंद्य मानुन
कार्य करील
#नाथ_देवराई_फाउंडेशन


  माणकोबावाडा यवत येथे वृक्षप्रेमी युवा कार्यकर्ते एकत्र येत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधत एक नाविन्यपूर्ण सोहळा व्हावा यासाठी या तरुणांनी वृक्षसंवर्धनाचे कार्य आपल्या हातुन घडावे म्हणून हरीतवारी फाउंडेशन कडुन प्रेरणा घेऊन माणकोबावाडा यवत  येथे नाथ देवराई फाउंडेशन ची स्थापना करून वृक्षारोपण केले.
यामध्ये  वड, पिंपळ, चिंच, लिंब, करंज, बकुळ, कांचन ही झाडे आहेत.
 सध्याच्या परिस्थितीचा विचार करून गर्दी टाळून साध्या पध्दतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर माणकोबावाडा येथे श्री सिद्धनाथ मंदिर परिसर, खंडोबा मंदिर परिसर, आणि भिवाई माता मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी  पोपट लकडे,  दत्तात्रय पिंगळे,  राहुल बिचकुले,  हनुमंत बिचकुले, आकाश बिचकुले, प्रशांत पिंगळे आणि विशाल खताळ या युवकांनी पुढाकार घेऊन जोगेश्वरी ग्रुप आणि माणकोबावाडा ग्रामस्थांच्या मदतीने भविष्यात नाथ देवराई फाउंडेशन कडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येईल असे मत व्यक्त केले.
     याचप्रमाणे तरुणांनी पुढाकार घेऊन असे कल्पक प्रयोग करून जयंती व सण उत्सव साजरे केले तर सर्वत्र हिरवाई दिसेल आणि समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण होईल. म्हणूनच तरुणांनी आपल्या कल्पना व शक्तीचा उपयोग समाज हिताचे कार्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
      साध्या पद्धतीने निसर्गाप्रती आदर ठेवत वृक्षारोपण करून माणकोबावाडा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली






शनिवार, २५ एप्रिल, २०२०

श्रीमंत भुषणसिंह राजे होळकर


माझ्या मनातलं राजं श्रीमंत भुषणसिंह राजे होळकर





माझ्या मनातलं राजं
राजेभुषणसिंह होळकर
वंशज होळकर राजघराण्याचे
थोर आहेत त्यांचे विचार

पुण्यश्लोक अहिल्यामाई

त्यांचे अंगी बाणले विचार
ठेवुनी मनात सदैव आदर
चालती त्यांच्याच विचारावर

सर्वगुणसंपन्न माझा राजा

तेजस्वी वलय चेहऱ्यावर
होळकर पगडी डोईवर 
राजा शोभतो रुबाबदार

लाभले भाग्य आम्हास

सोबतीला राजे होळकर
प्रेरीत झाला धगधगत्या मनात 
होळकरशाही मावळा साकार

राजे दंग नव स्वराज्यनिर्मितीस

शिलेदार आम्ही सोबतीला
राजे चाला पुढे पुढे तुम्ही 
आपण निर्मुया नवस्वराज्याला

साकडे घातले मार्तंडाला

वंदन राजमाता अहिल्यादेवींना
 राजेभूषणसिंह मिळाले आम्हाला
तुम्हीही धावुन यावे मदतीला

वंदन भवानीमाता चरणासी

वंदन शिवराय चरणाला
वंदन करितो देवादिकासी
उदंड आयुष्य  लाभूदे राजाला

भुषणसिंहराजेंच्या कार्याला....

मनी इच्छिल्या धेयाला
लाभूदे यश किर्ती साफल्य
हिच प्रार्थना परमेश्वराला....

श्री. राहुल दादा बिचकुले
माणकोबावाडा, यवत
ता. दौंड, जि. पुणे

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

#शुन्य

आपण स्वतःला कधी कमी लेखायचं नाही, कारण शून्याची किंमत कधी शुन्य नसते. शून्याच्या सोबत एखादा अंक मिळाल्यास दहाच्या पटीत त्याची किंमत वाढत असते.
#शून्य

-- राहुल बिचकुले

https://www.matrubharti.com/bites/111401359

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

#विश्व

#विश्व

अवघे विश्व झुकले
एका जंतुठाई
हे सारे घडले
माणसा तुझ्या हट्टापायी ...!

-- राहुल बिचकुले

https://www.matrubharti.com/bites/111400107

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

#वन्य





#वन्य

रानातले रानपशु
हुंदडती बागडती
असे हे वन्यजीव
सृष्टी निर्माणाचे कार्ये करिती...!

एका दुसऱ्याचा आधार
असा अन्नसाखळी व्यवहार
करिती आनंदी जगण्याचा प्रयत्न
असे हे जीव आहेत वन्य...!

-- राहुल बिचकुले

https://www.matrubharti.com/bites/111399708

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

कोरोनाशी लढा




जरी कोरोना व्हायरस आलंय चायना वरून
हे युद्ध लढायचं आपल्याला आपल्याच घरून

आपला भारत देश महान
आपण भारताचे जवान
देशसेवेची नामी संधी
आज आलीया चालुन
हे युद्ध लढायचं आपल्याला आपल्याच घरून

शासन प्रशासन डॉक्टर नर्स
पोलीस लष्कर मिडियावाले
यांचे मानुया आभार
अत्यावश्यक सेवेसाठी
घेतला देशपुत्रांनी आपल्या
खांद्यावर भार
करू सहकार्य हेच कर्तव्य
आता गर्दी टाळून
हे युध्द लढायचं आपल्याला आपल्याच घरून

घेऊ हाती शस्त्र जपू आरोग्य मंत्र
जर असेल सर्दी खोकला
घेऊ आपण वैद्यकीय सल्ला
मास्क लावूया तोंडाला
सामोरे जाऊ उपचाराला
नको भीती जगु आंनदी जीवन
आता मागे लागु कोरोनाच्या
आपले हात स्वच्छ धुवून
हे युध्द लढायचं आपल्याला आपल्याच घरून

सुरू झाले जीवयुद्ध
घातला जगाला विळखा
जरी मंदिरे बंद झाली
देव नाही हो झोपला
मंदिराचे रूप दवाखान्याला
डॉक्टर देवदूत हो झाला
आता फक्त पाहिजे आपली साथ
सर्वांना प्रेरणा दयावी घरून
हे युध्द लढायचं आपल्याला आपल्याच घरून

आता फक्त एकच करायचं
आपण घराबाहेर नाही पडायचं
आपले आरोग्य आपण जपायचं
शासन प्रशासन जे सांगतील ते ऐकायचं
आणि आपल्या कुटुंबासाठी हिमतीने जगायचं
आतापासून माणूस आहे माणूसकीने वागायचं
आपलं हे रोजचं वागणं पाहून
कोरोना जाईल भिऊन
हे युध्द लढायचं आपल्याला आपल्याच घरून

सर्व या संकटाशी दोन हात करणाऱ्या देशपुत्रांचे आभार.
व सर्वांना एक कळकळीची विंनती आपण सर्वजण मिळूनच हे संकटं पळवुन लावू शकतो. त्यामुळे सर्व शासन आदेश पाळा.
मी घरी आहे
आपणही घरी रहा.
आरोग्याची काळजी घ्या
देशहितासाठी कार्य करतोय
घरीच राहून कुटुंबासाठी देशासाठी जगा
माणूस आहे आपण माणुसकीने वागा

कोरोनाला जंतू समजून निष्काळजीपणाने वागू नका
आपण स्वतःला व कुटुंबाला धोक्यात आणू नका
त्यामूळे घरी बसा

© राहुल दादा बिचकुले
यवत, माणकोबावाडा

सोमवार, २३ मार्च, २०२०

कोरोना आणि गांभीर्य

कोरोना आणि गांभीर्य

कोरोनाला पळवून लावू

     कोरोना एक राष्ट्रीय आपत्ती आहे.  चिनपासून सुरवात झाली आणि या कोरोनासुराने एक एक देश आपल्या कवेत घ्यायला सुरुवात केली संबंध जगातील देशांची आणि देशवासियांची व प्रशासनाची पळापळ चालू केली.

    सर्वजण बोलायला लागले आपल्याला जिंकायचंच आणि कोरोनाला हरवायचंच पण हरवणार कोण?
सरकार ?
प्रशासन ?
सरकारी कर्मचारी ?
डॉक्टर - वैद्यकीय कर्मचारी ?
पत्रकार ?
यांनीचं लढायचं का या कोरोनाशी?
आणि आपण मात्र शासन आदेश धुडकावून इकडे तिकडे मोक्कार फिरायचं आणि आपल्याकडे नसलेला कोरोना संसर्ग आपल्या घरी पाहुणा म्हणून आणायचा व आपल्या घरातील तसेच शेजाऱ्यांशी त्याची ओळख करून त्याला आपलं घरोबा करून ठेवायचं आणि आपण मात्र वरील या पाहुण्याशी लढणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण पाहुणे म्हणून जायचं.
खरंच जनतेने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. चीनने काय उपाययोजना करून कोरोनाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. व सध्या इटली व इतर देशांची काय परिस्थिती आहे. याचा बारीक विचार करून आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत. प्रशासनाला सहकार्य  मिळेल असे वागले पाहिजे. शासनाचे आदेश तंतोतंत पाळले पाहिजे ज्यामुळे ही परिस्थिती लवकरच आटोक्यात येईल.
आज विचार केला तर काही महाभाग राजकीय विचारांवर भाष्य करून जनतेमध्ये राजकीय विचारांचे विष पेरून राजकीय विचारांचा उद्रेक करू पाहत आहे. म्हणजे आपली मानसिकता किती भुरसटलेली आहे हे आपण दाखवून देत आहोत.
रोज रोज तेच तेच सांगून आज प्रशासकीय अधिकाऱ्यांचे घसे बसू लागलेत. पण त्यांचा आवाज काही महाभागांना अजूनही ऐकू येत नाही. ते खुलेआम आजारी असताना गर्दीत फिरतात तर काही विनाकारण गर्दी करतात शासन आदेश मोडले म्हणजे आपण काही वेगळे केले या अविर्भावात मिरवतात. पण त्यांनी हे समजून घेतले.
पाहिजे शासन आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी देशहितासाठी झटत आहे. आपण फक्त आपल्या परिवारासाठी घरी बसा, गर्दीमध्ये जाऊन कोरोनाला पाहुणा म्हणून घरी घेऊन येऊ नका.

कृपया सर्वांना विंनती आहे.
     रोजची परिस्थिती पहा. ती आत्ताच आपण आटोक्यात आणू शकतो त्यासाठी फक्त शासन आदेशानुसार घरी बसुन काम करा. शासनाला सहकार्य करा.
    सर्वांनी दोन मिनिटे डोळे मिटून शांतपणे विचार करा. आजची ही परिस्थिती आपल्या एका बेजबाबदार वागण्यामुळे उद्या किती भीषण रूप धारण करेल.
काळजी घ्या,
शासन आदेश पाळा
आणि गर्दी टाळा
नाहीतर....
त्यामध्ये होरपळेल....
आपण स्वतः
आपले कुटुंब
आपले शेजारी
आपले गाव
आपला तालुका
आपला जिल्हा
आपलं राज्य
आणि आपला देश
म्हणून प्रत्येकाने स्वतः विचार करून वागा
हीच वेळ आहे आपण घरी बसून देशहितासाठी
आपल्या कुटुंबासाठी जगा

शासन आदेशानुसार आपण फक्त गर्दी न करता घरी बसून या कोरोनासुराला ठार करू शकतो.
फक्त शासन आदेश पाळा
घरीच रहा
विनाकारण गर्दी टाळा

माझ्या भारत देशाच्या सुजाण नागरीकहो आपल्या पूर्वजांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रक्त सांडले. त्यांचेच आपण शूरवीर वंशज आपण फक्त आता शांतता पाळून गर्दी न करता हे महामारीचे युद्ध जिंकायचंच आहे.

मी घरीच आहे.
आपणही घरीच रहा
शांतता पाळून देशहितासाठी कार्य करा....

राहुल दादा बिचकुले..

शनिवार, २१ मार्च, २०२०

कोरोना


कोरोना
राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाली
आला आहे हा कोरोना रोग
न घाबरता सामोरे जायला हवे
हे युद्ध घरातूनच लढायला हवे
आता आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे
हे युद्ध आपल्याला जिंकायचंच आहे

नको भीती नको गैरसमज
नको अंधश्रद्धा नको अफवा
शासन निर्देश पाळा
बाहेर जाणे टाळा
आता युद्धासाठी आपण स्वतः तयार व्हा
रोज सतत आपले हात स्वच्छ धुवा
आणि शासन आदेशानुसार घरातच रहा

आपली पतप्रतिष्ठा कोरोना पहात नाही
जात धर्म भेदभाव तो मुळीच मानत नाही
त्यामुळे नका करू गर्दी
उपाय करा असेल जर खोकला सर्दी
तुम्ही सुजाण नागरिक आहात
आता सुजाणतेने वागा
देशहित, देशकर्तव्य, कुटुंबासाठी जगा

सरकार, डॉक्टर, 
पोलीस, सरकारी कर्मचारी
आपला जीव धोक्यात टाकून
सांभाळत आहे हि सारी जबाबदारी
याची ठेवून जाण
उरी बाळगू अभिमान
करून त्यांना सहकार्य
करू कोरोनाला हरवण्याचे कार्य
त्यासाठी शासन आदेशानुसार नुसार चाला
करू कोरोनावर हल्ला

माझा शासन आदेशाला पाठिंबा आहे
तुम्हीपण पाठिंबा द्या
सहकार्य करू शासनाला
वेळ देऊ कुटुंबाला
आणि पळवुन लावू कोरोनाला.....

सर्व कोरोनाला हरवण्यासाठी सज्ज झालेल्या जवानांना,
सरकार, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पत्रकार, यांना माझा सलाम आहे. आणि लवकरात लवकर यश मिळो यासाठी खुप खुप शुभेच्छा आहे.💐💐💐


© Rahul dada bichkule

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

प्रेरणास्थान महानायक महाराजा यशवंतराव होळकर


वंदन माझे महाराष्ट्राच्या राजाला 
छत्रपती शिवाजी राजाला
वंदन माझे बा मल्हारबाला
त्यांच्या थोर कर्तुत्वाला
वंदन माझे पुण्यश्लोक मातेला
श्रद्धास्थान पुण्यश्लोक अहिल्यादेवींना
करितो नमन थोर संत महापुरुषांना
त्यांच्या थोर विचारांना
मनोभावे वाहतो शब्द पुष्पांजली
प्रेरणास्थान महानायकाला
थोर श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर
यांच्या पुण्य स्मृतीला

इतिहासाच्या पानांमध्ये 
इतिहास दडला
प्रेरणास्थान वीर झुंझार
अजिंक्य महायोद्धा
आद्य स्वातंत्रवीर
चक्रवर्ती महाराजाधिराज
श्रीमंत यशवंतराव होळकर
अजिंक्य महायोद्धा या इतिहासात घडला

ऐकता इतिहास 
अंगी शहारं
असा रणझुंजार
येता रणभूमीवर 
शत्रू मनी भरं कापरं
एक होता ऐसा वीर
अजिंक्य महायोद्धा 
राजा यशवंतराव होळकर

भगवा फडकविला
दिल्ली तख्तावर
उत्तर हिंदुस्थानी 
केला कारभार
कधी हार ना मानली
शत्रूच्या म्होरं
एक होता ऐसा वीर
अजिंक्य महायोद्धा 
राजा यशवंतराव होळकर

लढा स्वातंत्र्याचा उभारीला 
एक एक मावळा गोळा केला
कधी कुणापुढे ना झुकला
उत्तर दिलं परक्यांला
आधार स्वकीयांला
सलाम अशा महायोध्याला
एक होता ऐसा वीर
अजिंक्य महायोद्धा 
राजा यशवंतराव होळकर

आद्य स्वातंत्र्यवीर अजिंक्य महायोद्धा महाराजाधिराज श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांची प्रेरणाज्योत सदैव मनात तेवत राहो

© राहुल दादा बिचकुले

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

विनम्र अभिवादन - शूरवीर तानाजी मालुसरे

फोटो स्रोत - फेसबुक





धन्य धन्य छत्रपती शिवराय
धन्य त्यांचे सवंगडी
त्यागुनी रायबाचे लग्न
टाळले स्वराज्यावरील विघ्न
देऊनी प्राणाची आहुती
गड राखला स्वराज्यामधी
असा एक शूरवीर
नरवीर तानाजी मालुसरे...!!!
करुनी शत्रूवर वार
भगवा फडकविला गडावर
देह ठेविला भूमीवर
करीत हर हर महादेव चा गजर
स्वराज्यात गड आला
पण गड राखणारा सिंह गेला
नमन माझे त्या वीराला
नरवीर तानाजी मालुसरेला
त्याच्या त्या कर्तुत्वाला
आधी स्वराज्य मग रायबाचे लग्न
नमन त्या विचाराला
स्वराज्य प्रेम, त्यागाला
सवंगडी मैत्रीस जागला
पडता बातमी कानी
युद्धास सज्ज झाला
नमन अशा थोर मैत्रीला
विनम्र अभिवादन या शूरविराला
नरवीर तानाजी मालुसरे ला



- राहुल

रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

भटकंतीचे वेड

हे प्रेम नव्हे
हि तर आपुलकी
माणसं जोडणारी माणुसकी
आज उद्या आणि कायमची 
साथ देणारी दोस्ती
हि आहे मैत्री
जिवापाड माया लावणारी
दुःखात साथ देणारी 
सुखात पुढे नेणारी
जोडायचं असेल तर 
माणसं जोडा
फोडायचं असेल तर 
वाईट विचार फोडा 
घडवायचं असेल तर 
चांगली माणसं घडवा 
शिकवायचं असेल तर
चांगलं काहीतरी शिकवा
फिरायचं असेल तर 
खेडोपाडी फिरा
शोधायचं असेल तर 
संस्कृती, इतिहास शोधा
असे हे अवलिया
माणसात माणुस
गावात संस्कृती
आपला इतिहास
शोधत फिरणारी 
भटकंती वेडी
आपल्या वेडासाठी जगणारी
वेडी माणसं
अमाप प्रेम देतात
सदैव साथ देतात
विकासाला योगदान देतात
प्रेम हेही करतात
गावावर
इतिहासावर
आपल्या माणसावर

गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

सखे तुझी फार आठवण येते

सखे



सखे... सखे

तुझी आठवण फार येते
तू नसते जेव्हा सोबत
पण डोळ्यासमोर चित्र उभे राहते

आठवतात रोजचे दिवस
आठवते तुझी सोबत
तुझा सहवास जणु 
गुलाबाचे फुल 
मऊ मुलायम स्पर्श
आणि मोहक अदाकारी
सतत आठवते

आणि मन भेटीसाठी व्याकुळ होते
तुझी हवी सदा सोबत
आज, उद्या आणि कायमची 
हिच साथ ग जन्मोजन्मीची

नको दुरावा

नको ग रुसवा
तुझ्याविना दिवस सरकत नाही
तु थोडी दूर जाता
मन व्याकूळ होई

रविवार, २६ जानेवारी, २०२०

जय जवान जय किसान



वंदन भारतभूमीला
वंदन भारतमातेला
भारतमाता, राष्ट्रध्वजाला
करितो वंदन
शूरवीर जवान अन्नदात्या किसानाला

भारतमातेचे दोन पुत्र
देशसेवेत वाहुन घेती स्वतःला
 एक वाचवितो देश भूमीला
एक जगवितो देशाला

हिमगिरी सागरकिनारी
असो कोणती प्रसिध्द नगरी
या भूमीत पाय ठेवील काय वैरी 
करुनी छाताडावर बंदुकीची फैरी
गाडील मातीत दुश्मनाला 
सलाम या भारतमातेच्या सुपुत्राला
शूरवीर जवानाला

मातीमध्ये गाळूनी घाम
करितो कष्टाची कामं
करुनी रक्ताचं या पाणी
पिकं पिकवितो मोत्यांवाणी
असा जगाचा पोशिंदा शेतकरी 
जगवितो साऱ्या जगाला
सलाम या भारत मातेच्या सुपुत्राला
अन्नदात्या किसानाला

तुम्ही आम्ही देशाचे सुपुत्र
देशासाठी कार्य करू
देशसेवा जागी ठेऊन मनात 
देशसेवेत वाहून घेऊ
करू देशाच्या जवानांचा आदर
देऊ जगाच्या पोशिंद्याला आधार
करुनी सलाम भारतमातेला
देश सेवेत वाहून घेऊ स्वतःला

भारतभूमी आमुची शान
जय जवान जय किसान 
चला करू एकच नारा
करू सुंदर भारत देश हा सारा

जय हिंद.... जय महाराष्ट्र...



मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

प्रेम आंधळं असतं ते असं ...!!!




मी जेव्हा तिला पाहिलं
 तेव्हा नकळत प्रेमात पडलो 
आणि तिचे गोड गुलाबी सौंदर्य न्याहाळत बसलो
 तिच्या सौंदर्यावर मोहित झालो
 मला पाहून ती हसली
 मला वाटलं आता कळी फसली
 म्हणून मी रोज येता-जाता पाहू लागलो
 मला पाहून तिचं सौंदर्य आणखीच फुललं
आणि एके दिवशी ते सुकून गेलं
 तेव्हा ते गुलाबाचं फुल होतं हे मला कळलं 
म्हणतात ना प्रेम आंधळ असतं
ते असं ....!!!

- राहुल बिचकुले

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...