शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले

सुशिक्षित झाल्या नारी

हिच पुण्याई माईंची सारी

सोसले दुःख किती

लावल्या ज्ञानाच्या ज्योती

जगाचे बदलले विचार

केले मुलींना साक्षर

आधार झाली ज्योतिबाचा 

ज्ञानज्योत लावण्याचा वसा हा सावित्रीचा

तुच ज्ञानज्योती

तुच क्रांतीज्योती

ज्योत लावली शिक्षणाची

भविष्य बदलली आम्हा लेकींची

नमन माझे तुला माऊली

ज्योतिबाची तुच सावली

ज्ञानज्योत तुच लावली

भविष्य आमुची उजळुन निघाली

    कवी : राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...