मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९

आता कसं वाटतया गार गार


आता कसं वाटतया गार गार

प्रेमाची नशा आन जीवाची दशा
कळना काय ते खर
आता कसं वाटतया गार गार
गार गार गार गार गार गार
कसं वाटतया गार गार

जीव प्रेमात हा पडला
नसता प्रसंग हातून घडला
आता मनाला प्रश्न पडला
कसं सांभाळू प्रेमाला

आईटम मिळाला झ्याक लई
पण प्रेमाच खर नाही
मनाला बोच आन खिशाला ओझ
सहन होत नाही हे सार

आता कसं वाटतया गार गार
गार गार गार गार गार गार
कसं वाटतया गार गार

तिची नशीली ती अदा
झालो तिच्यावर मी फिदा
मग करून टाकला वादा
केला प्रेमाचा माझ्या सौदा

सौदा हा घडला आन प्रसंग नडला
भेटना झाली लवकर
पडलं ओझं मनावर
या प्रेमाच नसत काही खर

आता कसं वाटतया गार गार
गार गार गार गार गार गार
कसं वाटतया गार गार

या पोरीच्या फिरन माग माग
जीव रात रात जाग
काय नशिबाला भोग
केला स्वप्नांचा मी त्याग

त्याग मी केला
कसं विसरू प्रेमाला
धोका तीन मला दिला
पडला मनाला विचार
प्रेमाचं नसत काही खर

आता कसं वाटतया गार गार
गार गार गार गार गार गार
कसं वाटतया गार गार
© कवी : राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...