रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

देव हरवला (कविता)

देव हरवला

शोधू कुठं मी देवाला
देव हरवला

किती आवाज देऊ
साद मिळेना आवाजाला
किती घालू गाऱ्हाणी 
ऐकु जाईना देवाला 
देव हरवला

भीक मागतो मंदीराच्या पायरी
पोट माझं भरणा
पीळ पडतं आतड्याला
अन्न मिळणा पोटाला
दया येईना देवाला
देव हरवला

मंदिरात पाप घडते
भ्रष्टचारी तिथेच दडले
समजना तरी देवाला
देव हरवला

सर्व सारखे आहे देवाला
मग शिक्षा का बळीच्या बकऱ्याला
माणूस आणि बकरा यातील भेद ना कळला
खरच हे समजतं का देवाला
देव हरवला

म्हणे न्याय कळतो देवाला
पण न्याय अन्याय ना समजला 
सोडून देतो चोराला
शिक्षा मात्र संन्याशाला
खरच हे समजत का देवाला
देव हरवला

निष्पाप जीवावर होतो अन्याय
पाप्याला भेटतो न्याय
म्हणे पुण्यवान जातो स्वर्गा
पापी नरकाला
पण भविष्याची भीती कोणाला 
शिक्षा मिळावी या घडीला 
हे समजत नाही देवाला 
देव हरवला

म्हणे देव आहे देवळात
नाही शोधत माणसात
देव कोठे आहे ना कळले कोणाला 
देव हरवला

खरच देव आहे कोठे
मी अजून ना पहिला
जो शिक्षा करतो पाप्याला
मिटवतो अन्यायाला
देव हरवला

©कवी : राहुल बिचकुले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...