देव सापडेना
मनाच्या गाभाऱ्यात माणुस
देवाला शोधीना
माणसात दडलेला देव
माणसाला सापडेना
देव सापडतो दगडात
देव सापडतो भोंदूबाबात
पण देव सापडेना भूकेल्यात
देव सापडेना माणसात
गरीबही काढुन कर्ज
करतो जात्रेलाही खर्च
पण करीना कधी दान
देव दडला माणसात
कधी पाहीना शोधुन
रोज करीती देवदेव
अंधश्रद्धेला फुटला पेव
भोंदुबाबांना आला चेव
रोजच्या विचाराने खालावून परिस्थिती
भरलं माणसालाही हिव
जरी बांधली मंदिरे
नाही येत त्याने बाधा
मंदिरात एकत्र येऊन
त्यातुन प्रगती साधा
नको अंधश्रद्धेला थारा
भोंदुगिरी दुर करा
देव आहे माणसात
देव आहे निसर्गात
जपा आपलं हे माणुसपण
करा निसर्गाचे रक्षण
होतील देवही प्रसन्न
देईल सुखाचं वरदान
देव शोधा मनाच्या गाभाऱ्यात
देव शोधा माणसात
देव सापडेल तुम्हा आम्हात
देव सापडेल निसर्गात
देव सामावला चराचरात
देवाचा हा शोध
घ्या या सृष्टीत
देव भेटेल तेव्हा
आपल्याला साक्षात
प्रश्न हा उद्भवणार नाही पुन्हा
देव सापडेना... देव सापडेना...?
© कवी / लेखक : राहुल
दादा बिचकुले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी