रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

बालपणाची श्रीमंती

बालपणाची श्रीमंती

आजही बालपण आठवलं कि आठवतात त्या वेळच्या अनेक गोष्टी, अनेक प्रसंग त्यातुन ते निरागस, निस्वार्थी प्रेम, जिव्हाळा त्यातुन निर्माण होणारी भागीदारी आणि ती जपण्यासाठी केलेला जीवाचा आटापिटा आजही आठवला कि, आठवतं ज्याला चांगला जोडीदार, ज्याच्याकडे जास्त गोट्या, ज्याच्यामागे जास्त मित्र, ज्याच्याकडे फळाफुलांच्या जास्त बिया आणि ज्याची प्रभावी टिम तो बालपणात श्रीमंत आसं मनाला वाटायचं.......          त्यातलाच मी एक भाग्यवान......आज ते बालपण आठवलं कि हसायला येतं आणि मन भरूनही येतं. मी लहान असताना माझी दोस्ती अनेकांशी चांगली होती त्यात सुभाष, हनुमंत, हॅलो ब्रदर भानुदास, आणि सगळ्यात जवळीक होती ती बालमित्र पोपटशी माझ्या दिवसाची सुरुवात त्याच्या भेटीनं आणि दिवसाचा शेवटही त्याच्याच भेटीनं व्हायचा..... कारण शाळा सोडली तर मी जास्त वेळ त्याच्या सोबतच असायचो......    ते दोस्तीचं एक वेगळं नातं होतं... आम्ही दोघं गोट्या खेळण्यातही एकत्र एका टिममधून असायचो आणि रानातही वांगी, भोपळे लावायला एकत्र असायचो आमच्याच घरामागच्या माळाच्या वावरात आम्ही दोघांनी वावरातील पाटाला वांगी आणि भोपळे लावले होते ते दोघंही विभागुन घरी न्यायचो....त्यात कुठलाही स्वार्थ नव्हता कोणी कमी कोणी जास्त हा कधी वाद नव्हता हि खरी भागीदारी होती. त्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे झाडांच्या बिया गोळा करणं तेही मोठया खुबीनं आम्ही करायचो आम्हीचं लावलेल्या वांग्याच्या झाडावरील पिवळीझरत वांगी आम्ही वाळवायचो आणि त्याच्या बिया एका औषधाच्या बाटलीत भरून त्यावर मोठया खुबीनं लाकडी खुट्टा झाकण म्हणुन बसवायचो हि कला आणि ती झाडं म्हंजीचं बालपणाची श्रीमंती होती. बालपणाचा आवडता खेळ तो म्हंजी गोट्या बालपणी आम्ही गोट्याही खुप खेळलो त्यात आम्ही दोघं एकाच बाजूनं असायचो आमच्याकडे गोट्याही खुप होत्या पाण्याच्या बाटल्या आणि एक लोखंडाची पेटी भरून गोट्या जमा केल्या होत्या यामधी कितीतरी हंटर(गस्टर), तीन चार लोखंडी हंटे, अशी मोठी संपत्ती गोळा केली होती.... कारण त्याकाळी पैशापेक्षा या संपत्तीला मोल जास्त होतं आणि ते आम्ही जपलं होतं म्हणुन त्याकाळी पैसा नसूनही आम्ही श्रीमंत होतो......खरंच बालपणात आणखी काय वेगळं श्रीमंत असायला हवं..... जे आज आंनद देतं त्यापेक्षा अधिक मोलाचं धन ते कोणतं?........

© लेखक : राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...