रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

मी प्रेम करणं सोडलं

मी प्रेम करणं सोडलं

बऱ्याच दिवसाच्या आठवणी अश्याच पुन्हा जाग्या होतात काहीतरी प्रसंग निर्माण होतो आणि मनात खोलवर दडलेल्या आठवणींना पुन्हा पाझर फुटला जातो ....
  आज असाच एका जोडीदाराचा एक लेख वाचला आणि मन थोडं भावनिक झालं तसं मी आता जास्त भावनिक होतं नाही पण काही वर्षांपूर्वी खूप भावनिक होतो. सहज कोणत्याही गोष्टींशी जोडला जात होतो. ...
लहानपणी मला कुत्रीचं पिल्लू, मांजराच पिल्लू पाळायला खूप आवडायचं असंच एकदा मी एक मांजराच पिल्लु पाळण्यासाठी आणलं आन त्याला खुप प्रेमानं वाढवलं एकप्रकारे जीवच जडला होता माझा त्या पिल्लावरी, शाळेतुन घरी आलो तरी पहिलं त्याला पाहायचो,  तेही मस्तपैकी माझ्या शेजारी येऊन बसायचं आणि त्याच ते प्रेमानं जवळ बसणं आणि पायात घुटमळणं भारी गॉड वाटायचं... कारण ते पायात घुटमळत असताना अंगाला अंग घासायचं तस करीत असतानाच त्याच गुरगुरन आणि अंगाला होणारी स्पर्शाची दरदर आजही जाणवते...
खूप प्रेमानं सांभाळलं होतं त्याला मी आजवर एवढा जास्त जीव मी त्याच पिल्लाला लावला आसलं तेही हळुहळु मोठ्ठ होत होत पण म्हणत्यात ना लै प्रेमानं वाढवलं कि एक दिवस ती गोष्ट मनाला दुःख देऊन जाती...
असाच एक दिवस उजाडला जो मला रडवून गेला. तीच एक रात्र ज्या दिवशी ते मांजराच पिल्लु घराबाहेर राहिलं... आणि रात्रीचं त्या पिल्लावर आमच्याच कुत्रीनी हल्ला केला त्यात ते जखमी झालं त्याचं पॉट फाटलं.... आणि त्यामुळं होणारी त्याची तळमळ खरंच काळजाला चिरत गेली... भावनेचा बांद फुटला घसा कोरडा पडला तसंच त्याला कापड हातरून त्यावर ठेवलं ते शेवटच्या श्वासापर्यंत ते तळमळत आणि त्याचा ओरडण्याचा आवाज हळुहळु कमीकमी होतं होता आणि शेवटी तो आवाज पूर्ण विरला आणि त्याची तडफड आणि श्वास ही अखेर बंद झाला पण त्या प्रसंगानी मला खुपच भावनिक बनवुन टाकलं आणि त्याच दिवशी मी ठरवलं जे मनाला दुःख देतं आशा भानगडीत पडायचं नाय तव्हापासुन मी जीव लावणं आणि प्रेम करणं सोडुन दिलं.......

© लेखक : राहुल दादा बिचकुले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...