मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

टाईमपास ( मराठी कविता )

टाईमपास 


उजाडला आजचा दिवस
लागली मला तुझी आस
वाटू लागले काही खास
मन सांगु लागले अरे हा तर टाईमपास 


तुझे माझे नाते ठाऊक फक्त देवास
तुझा माझ्यावर विश्वास
माझा तुझ्यावर विश्वास
म्हणूनच लागते तुझी आस
मन सांगु लागले अरे हा तर टाईमपास 


तु बोलाते तुझ्या मनास
मी बोलतो माझ्या मनास
काय वाटते लोकांस
ठाऊक फक्त देवास
मन सांगु लागले अरे हा तर टाईमपास 


जपावं आपण आपल्या मैत्रीस
चालना द्यावी प्रगतीस
तरच होईल विकास
आवश्यक असतो मैत्रीपूर्ण सहवास
मन सांगु लागले अरे हा तर टाईमपास 


टाईमपास हा नव्हे टाईमपास
येथेच मिळते शिकण्यास
चालना मिळते विचारास
उधान येते आनंदास
मन सांगु लागले अरे हा तर टाईमपास 


महत्व तुझ्या शब्दास
महत्व माझ्या शब्दास
चिंतावे मागील आठवणीस
आनंद मिळेल मनास
मन सांगु लागले अरे हा तर टाईमपास 


© कवी/लेखक : राहुल दादा बिचकुले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...