इसवास
शेतात मस्त पीक जोमात डोलतय.. शिरपा शेतात पाणी धरीत होता. पाणी धरता धरता त्याच्यातील कलाकार जागा झाला. बाजूच्या शेतातील डुलणारं गव्हाच पिक पाहुन त्याची कल्पना शक्ती जागी झाली...
आन कल्पना करू लागला हे गव्हाचं पीक मस्त नर्तिकीवाणी नाचतया ती कल्पना रंगवता रंगवता शिरपा ही डूलू लागला. गव्हाच्या पिकातून वाऱ्यामुळे निघणारा सळसळ आवाज त्याच्यसाठी संगीत ठरला आणि शिरपा गुणगुणायला लागला....
पाटामंदी पाणी कसं
वाहतं झुळझुळ
वाहत... वाहत झुळझुळ
गव्हाच्या या रानामंदी
वारा घालतोया शीळ
वारा घालतोया शीळ
वारा ... घालतोया.. शीळ
गव्हाचं हे पिक जणु
नाचती नर्तिका
नाचती नर्तिका...
मनातया खेळ चालं
खेळ चाल पिरतीचा
खेळ चाल पिरतीचा....
भुरळ पडती मनाला... या
होईल राजाची या राणी.. ती
राजाची या राणी
( शिरपा पार स्वप्नात जातो त्याला त्या गव्हाच्या पिक एक सुंदर नर्तिका असल्यासारखं भासतं.. आणि तो स्वप्न पाहु लागतो त्या राणीचा राजा व्हायचं तोपर्यंत वाफा फुटुन पाणी चाललेलं असतं आन बाप तिथं तेवढ्यात येतो)
बाप बांदाबांदानी येत असतो...
मनात विचार करतो. आयला हे शिरप्या असं का डुलतया.. वाया चाललेलं पाणी पाहुन बाप खवळतो. ये शिरप्या पाणी फुटलं बघ! शिरपा दचकुन बारं देतो आन पाणी आडवतो.
लक्ष कुठं हे पाणी फुटूस्तवर... निसती सपन बघा सपन. येऊन जाऊन पिचर च खूळ डोक्यात. दुसरं कायतरी करा. रानात बी लागत नाय मन निस्त दिसभर हुंडरायच आन पिक्चर करायचं म्हणतं.
आरं खूळ बीळ लागलं की काय येड्यावाणी निस्त पिक्चर पिक्चर! फुटला ना वाफा .
हे बघ शिरपा तू माझा मोठा पोरगा साळत डोकं चालत हुतं म्हणुन शिकविल पण तू काय हे खूळ घेऊन बसलाय पिक्चरचं.
बापू ..... बरोबर आहे तुमचं !
मी तुमचा मोठा मुलगा.... पण मला या छंदाने झापटलय बापु ....
आश्रू वाहु लागतात शिरपाचे.
शिरपा मलाबी लै वाटतं रं कि आपली पोरं मोठी व्हावी पण तु हे काय करतंय ते मला काय बी कळत नाय बग. हे सारखं गुणगुणन त्यातच हरवुन जाणं... त्यामुळं तुझं लक्ष कशातच लागत नाही (बापाच्याही डोळयांत पाणी येतं) तू काय बी कर पोरा पण चांगलं कर...
बापु मी आजपासुन कधीही तुमच्या डोळ्यातून पाणी येऊ देणार नाही... आजपासून मी माझा छंद हि जपिल, रानातील कामही करील आन शिकुन मोठा होऊन आपल्या घराचं गावाचं नाव वाढविल बापु... फक्त तुम्ही विश्वास ठेवा बापु... तुम्ही विश्वास ठेवा...
बाप पोराच्या गळयात पडतो. आणि रडत रडत म्हणतो
शिरपा माझा तुझ्यावर लै इसवास आहे. पोरा तु काय बी कर फक्त चांगलं कर.....
शिरपा आनंदी होतो गळ्यातील मिठी सोडतो. बापाच्या डोळयातील पाणी पुसतो. आन नव्या जोमानं काम करतो. ते पाहुन बापाचाही ऊर भरून येतो. आणि बोलतो.
शिरपा तु काय बी करू शकतोस फकस्त मनात आणलं पाहिजेन.... पोरा तुला काय करायचंय ते कर माझा तुझ्यावर इसवास हाय......
शिरपा आनंदानी काम करतो आणि सपनात न जाता मनात एक गाणं गुणगुणतो....
रस्ता काट्याकुट्याचा
तुडवीत मी जाईन
नको मला काही
हात पाठीवर राहुद्या
मी लढत राहीन
मी लढत राहीन .....©लेखक : राहुल दादा बिचकुले
यवत माणकोबावाडी ता. दौंड जि. पुणे
मो. 8888897533

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी