शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

भटकंती.... श्रीकांत हंडाळ यांना काव्य भेट


भटकंती

करीतो भटकंती गावोगावी जाऊनी
इतिहास दाखवुया
दौंड तालुक्याचा शोध घेऊनी

मी श्रीकांत
जपतो छंद
गावोगावी भटकंती चा
माणसं जोडण्याचा

गावोगावी जाऊनी
सारं गाव पाहुनी
घेतो शोध इतिहासाचा
गावच्या सौंदर्याचा

पाहिली अनेक गावं सुंदर
आहेत गावामधी मंदीर
मंदिर एकीचं प्रतीक
होतो सारा समाज तेथे एक

समाजाकडून मिळवुन माहिती
काय विशेष गावामधी
करुनी लेखन देतो प्रसिद्धी
गावाचं नाव होतं तालुक्यामधी

दौंड तालुक्यात अनेक गावाला
इतिहास सुंदर लाभला
आदर्श घालून देती जगाला
नजर ना लागो सुंदर गावाला

इथं अनेक माणसं भेटली
आहे प्रेमळ मनानं चांगली
काही भेटली साधी भोळी
धावुन येतील वेळी अवेळी

काय साधलं भटकंतीनं
एक सुंदर जीवन जगणं
माझ्या माणसांना भेटणं
प्रेम जिव्हाळा वाटणं

मी श्रीकांत
जपतो छंद
गावोगावी भटकंतीचा
माणसं जोडण्याचा

माझी हि भटकंती कविता माझे मित्र ज्यांना भटकंतीची अपार आवड असा साधा माणुस श्री. श्रीकांत सुदाम हंडाळ, केडगावकर यांना माझ्याकडुन भेट...

ध्येय आणि ध्यास 
मनात असावी लागते आस 
तेव्हाच घडतो इतिहास 
इतिहास घडविण्यासाठी 
असावा लागतो ध्येयवेडा माणुस 

असा ध्येयवेडा माणुस ज्याने आपल्या नोकरीतून सुट्टीचा वेळ काढुन आपली आवड म्हणुन जो भटकंती चा छंद जोपासला त्यातुन दौंड तालुक्याचा इतिहास नकळतपणे सर्वांना समजला असा माणुस माझा मित्र आहे याचा मला अभिमान आहे. आणि त्यांच्या कार्याला माझा सलाम आहे. आणि हि कविता त्यांच्यासाठी माझी छोटीसी भेट आहे. 
लेखक : राहुल दादा बिचकुले 

३ टिप्पण्या:

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...